नवीन तारफैल हत्याकांड उघड: ४ दिवसांत मुख्य आरोपी जेरबंद — रामदासपेठ पोलिसांची मोठी कारवाई

अकोला (प्रतिनिधी) — नवीन तारफैल परिसरात घडलेल्या अंकीत नंदागवळी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला असून, चार दिवसांच्या अथक शोधमोहीमेनंतर रामदासपेठ पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे.
दिनांक १४ जून २०२६ रोजी मध्यरात्री जुन्या वादाच्या सेटलमेंटच्या बहाण्याने अंकीत नंदागवळी याला बोलावून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष शेखर बनसोड (वय ३५, रा. तारफैल, अकोला) व आनंद भगवंत चवरे (वय २९, रा. अशोक नगर, अकोट फैल, अकोला) हे घटनेपासून फरार होते. मात्र रामदासपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दिवसरात्र शोध घेत अखेर १८ जून रोजी जळगाव जिल्ह्यातून दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.
या प्रकरणी फिर्यादी अंजली स्वप्नील बागडे (वय २६, रा. भिमज्योती चौक, अशोक नगर, अकोट फैल, अकोला) यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये अप.न. ४१८/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) तसेच ११८(१), ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी निलेश विजय बोरकर यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
आज दोन्ही मुख्य आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रमांक २ समोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २१ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे.
🔹 पोलिसांची कामगिरी व अधिकारी कर्मचारी —
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. श्री. शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, प्रदीप जोगदंड, पोलीस हवालदार श्याम मोहळे, दादाराव टापरे, सुरेश लांडे, संदीप वानखडे, किरण गवई तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रेम नांदोकार, अनिल धनभर, इमाम चौधरी, रोशन पटले, अभिजित इंगळे आणि महिला पोलीस अंमलदार माधुरी लाहोळे, कावेरी ठाकने, प्रियंका बागडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
👉 ४ दिवसांत गुन्हा उघड — पोलिसांची तत्परता की आरोपींची चूक? पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published.