अकोल्यात विरशैव लिंगायत समाजाचा भव्य उपवधू-वर परिचय मेळावा २२ मार्च रोजी

अकोला, प्रतिनिधी(शुभम गोळे):— विरशैव लिंगायत समाजातील उपवधू-वरांसाठी सुवर्णसंधी ठरणारा परिचय मेळावा रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ५.०० या वेळेत जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हील लाईन चौक, अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व शाखीय समाज बांधवांच्या आग्रहास्तव या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे.
या मेळाव्याचा मुख्य उद्देश समाजातील उपवधू-वरांना योग्य जोडीदार निवडण्यासाठी एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. मागील वर्षी झालेल्या मेळाव्याला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. मोठ्या संख्येने उपवधू-वर व पालकांनी उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी केले होते. त्याच प्रेरणेतून यावर्षीही अधिक व्यापक स्वरूपात मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याचे अध्यक्ष राजू आप्पा मिसे यांनी नोंदणीकृत सर्व उपवधू-वरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच समाजातील एकोप्याला बळकटी देणे, पालक व कुटुंबीयांचा परस्पर परिचय करून देणे आणि युवक-युवतींना संवादासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मेळाव्यासाठी उपाध्यक्ष मुकुंद भुकन, रविंद्र आप्पा कारंजकर, गजेंद्र आप्पा चिल्लूरे, मंगेश आप्पा डेहनकर, अमोल आप्पा बिडवे, अविनाश आप्पा मिटकरी, अतुल आप्पा बिडवे, राजेश आप्पा हेगु, डॉ. नितिन आप्पा बिडवे, प्रा. संतोष पस्तापुरे यांच्यासह महिला समिती अध्यक्ष सौ. अर्चना ताई मिटकरी, सौ. चिल्लूरे, सौ. डेहनकर, सौ. बिडवे, सौ. दलाल, सौ. भुरे, सौ. भुकन आदींसह अनेक समाज बांधव सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
मेळावा समितीचे सहसचिव डॉ. प्रा. संतोष पस्तापुरे यांनी ही माहिती देत, समाजातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याचे यश वाढवावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.