
अकोला |(प्रतिनिधी)
शहरातील लोकहितैषी, कर्तबगार आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या श्री महेंद्र डोंगरे यांच्या पुढाकारातून आज ‘The Fit Factory’ या अत्याधुनिक जिमचे भव्य उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. यावेळी नागरिकांचा उस्फूर्त सहभाग आणि उत्साह पाहण्यासारखा होता.
श्री महेंद्र डोंगरे यांचा सामाजिक कार्याची ओळख केवळ मदतीपुरती मर्यादित न राहता, आता ती नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी साकारलेल्या ‘The Fit Factory’ च्या माध्यमातून दृढ झाली आहे. विशेष म्हणजे, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही असून, आरोग्याच्या या उपक्रमाने तो एक संस्मरणीय दिवस ठरला.
‘The Fit Factory’ ही केवळ एक जिम नाही – ती आहे तंदुरुस्त आणि प्रेरणादायी जीवनशैलीची सुरुवात!
या ठिकाणी अत्याधुनिक व्यायाम उपकरणे, अनुभवी प्रशिक्षक, स्वच्छ व सकारात्मक वातावरण यासह सामान्य नागरिकांसाठी सवलतीच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.श्री महेंद्र जी यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले, “आर्थिक परिस्थिती कशीही असो, प्रत्येक व्यक्तीला आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.”
कार्यक्रमात बोलताना त्यांनी आरोग्याच्या बाबतीत होणाऱ्या दुर्लक्षावर भाष्य करत नागरिकांना नियमित व्यायाम, संतुलित आहार व सकारात्मक जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. “शरीर हेच खरे साधन आहे, ते जपणे म्हणजेच जीवन समृद्ध करणे,” असे प्रभावी विचार त्यांनी मांडले.
या उपक्रमासाठी मेहनत घेतलेल्या संपूर्ण टीमचे त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि तरुणाईने या जिमचा मनापासून स्वागत करत श्री महेंद्रजीं यांनी नव्या सामाजिक कार्यास भरभरून दाद दिली.
‘The Fit Factory’ ही अकोल्याच्या आरोग्याच्या दिशेने टाकलेली एक ऐतिहासिक पावले ठरणार आहे, असा विश्वास यावेळी सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आला.