युवकांनी आपल्या शेतकरी आई वडिलांकडून प्रेरणा घ्यावी – युवा वक्ते विशाल नंदागवळी

औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाळापूर येथे उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम संपन्न..

स्थानिक:

जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हा एका दाण्याचे हजार दाने करणारा पहिला उद्योगपती आहे. म्हणून आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या भविष्याकडे वाटचाल करावी.
राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्वराज्यातील मावळा आणि स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला तरुण जो समाजासाठी देशासाठी लढायला तयार होईल असा तरुण घडला पाहिजे. असे राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने अकोल्यातील युवा वक्ते विशाल नंदागवळी बोलत होते.

      अकोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाळापूर येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त  उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
       त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. सय्यद साहेब (नायब तहसीलदार बाळापुर)  तर प्रमुख उपस्थिती श्री चैतन्य धनोकार (सदस्य संस्था व्यवस्थापन समिती) प्रमुख वक्ते म्हणून श्री. विशाल नंदागवळी (संचालक सार्थक वकृत्व अकॅडमी अकोला) यांनी स्थान भूषवले. 

    श्री.गोकुळ मुंडे(प्राध्यापक व अशासकीय सदस्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभाग), श्री. गोविंद गावंडे (संचालक गावंडे कोचिंग क्लासेस पारस) व श्री. मंगेश देवगिरकर (संचालक एमडी करिअर पॉईंट अकोला) 

यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमानिमित्य मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सय्यद साहेब व श्री. राजेश धोत्रे सर प्राचार्य
यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

               कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांनी देखील उपस्थिती दर्शवून उद्योजकतेविषयी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. युवा दिवसाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाघ सर व श्री आसोलकर सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री बेलूरकर सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.