सौ.अनिता प्रविण कळसकर यांना समाजभूषण पुरस्कार…!

मुंबई:
प्रजासत्ताक सौ.अनिता प्रविण कळसकर यांना समाजभूषण पुरस्कार…! अमृत गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य २०२४साठी कल्याण जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक सौ अनिता प्रविण कळसकर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल लायब्ररी, वांद्रे मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डाॅ.बाळासाहेब तोरसकर, ज्येष्ठ साहित्यिक मुंबई, उद्घाटक ख.र.माळवे (महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती) स्वागताध्यक्ष प्रा.नागेश हुलावळे (अध्यक्ष वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई) प्रमुख पाहुणे डाॅ.जी. डी.यादव (अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था) डॉ. डेरिक एंजल्स (नासा शास्त्रज्ञ) डाॅ.सुकृत खांडेकर (दैनिक प्रहार संपादक) श्री.प्रमोद महाडिक नॅशनल लायब्ररी आणि डाॅ. नॅन्सी अल्बुकर्स इ. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत २५ ऑगस्ट ला नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद सुर्यवंशी, रमेश पाटील, योगेश हरणे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.