अकोला प्रतिनिधी :”सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, पोलीस स्टेशन बोरगाव मंजू हददीतील ग्राम दाळंबी ता. जि. अकोला येथे राहणा-या एका वयोवृध्द महीलेने पोलीस स्टेशनला येवून की, तकार दिली की, ती दिनांक २८.०५.२०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजताचे सुमारास अकोला येथून एस टी बसने ग्राम कोळंबी फाट्यावर उतरून तेथून प्रायव्हेट लक्झरी बसने तिचे गावी दाळंबी येथे जाण्यास निघाली व दाळंबी गावाचे पुलाच्या अलीकडे उतरली आणि तेथून पाई जात असतांना थोडे दुर अंतरावर तिचे ममोरून गेडने दोन मोटर सायकलवर तिघे आले. एका मोटर सायकलवरील दोन इसमांनी त्यांचे तोंडाला रूमाल बांधुन व एका मोटर सायकलवरील इसमाने काही बांधलेले नव्हते. त्या तिघांनी फिर्यादी यांना उचलून रोडचे बाजुचे लिंबाच्या मळ्यामध्ये आणले व तोंडाला बांधलेले दोन इसम तेथून निघून गेले, त्या ठिकाणी हजर असलेल्या तिस-या इसमाने फिर्यादी यांचे तोंड दाबून त्यांचे अंगातील लुगडे व ब्लाउज काढून तिचे सोबत जबरीने संभोग केला व कोणाला सांगितले तर मारून टाकणार अशी धमकी दिली, त्यानंतर त्याने तेथून त्याचे सोबत आलेल्या दोन इसमांना फोन लावला असता ते आले नाही, तेव्हा फिर्यादी सोबत संभोग केलेला इसम मारण्याकरीता दगड शोधत असता फिर्यादी तेथून तिचे कपडे घेवून पळून गेली, ती पळून जात असतांना तिला तिचे गावातील धर्मा शिंदे व व त्याचे सोबत एक इसम दाळंबी गावाकडे पाई जात असतांना दिसले तेव्हा फिर्यादी यांनी धर्मा शिंदे व त्याचे सोबत असलेल्या इसमास तिचे सोबत संभोग करणा-या इसमास पकडा असे म्हटले असता त्यांनी त्या इसमाचा पाठलाग केला असता तो तेथून मोटर सायकल घेवून पळून गेला, फिर्यादी यांनी आडोश्याला कपडे घातले त्यानंतर त्यांनी फिर्यादीला तिचे घरी नेवून सोडले, अशा फिर्यादी यांचे जबानी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे अप. नं. २८१/२०२४ कलम ३७६, ३७६ (डी), ५०६, ३४ भादंवि प्रमाणे दाखल करुन तपासात घेतला.सदर गुन्हा हा वयोवृध्द महीलेच्या संदर्भातील व आरोपी अज्ञात असल्या कारणाने त्याचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीम अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापूर, बोरगाव मंजुचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख यांचे वेगवेगळे पथक करून रोज मार्गदर्शन घटनेपासून करीत होते. तसेच मा. पोलीस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देवून तांत्रिक विश्लेषणात म्वतः मार्गदर्शन केले. वेगवेगळे पथक सी सी टी व्ही फुटेज व ईतर तांत्रिक बाबींवर तपास करीत असतांना गोपणीय माहीतीच्या आधारे आरोपी व आरोपीने गुन्हयात वापरलेले वाहन निष्पन्न करून आरोपी नामे राहूल अर्जुन मोरे वय २४ वर्ष रा. ग्राम शेलोडी ता. खामगाव जि. बुलढाणा यांस ताब्यात घेवून गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबूली दिली असून त्याने एकट्याने गुन्हा केल्याची कबूली दिली असून सोबत कोणीही नसल्याचे सांगितले व तसे तपासात निष्पन्न झाले आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर श्री. मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके, बांग्गाव मंजु पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ, एएसआय अरूण गोपनारायण, पोहवा योगेश काटकर, गिरीष विर, नारायण शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मचिन सोनटक्के, नितीन पाटील, सुदीप राउत, संदीप पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा अविनाश पाचपोर, रवि खंडारे, अब्दुल माजिद, वसीम शेख तमेच मायबर सेलचे प्रशांत केदारे व गोपाल ठोंबरे व चालक एएसआय गोविंदा कुळकर्णी यांनी केली आहे.