अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून १२० गुन्हे उघड

प्रशिक मेश्राम

अकोला प्रतिनिधी: अकोला जिल्हयामध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३. ३६६ (अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आज पावेतो

एकुण ८६ गुन्हे व ३४ मिसिंग असे एकुण १२० प्रकरणे उघडकिस आणले आहेत.

पोलीस स्टेशन अकोट शहर अप नं ४५०/२३ क ३६३,३७० भादवि ची डायरी तपासकामी अमावाकक्ष येथे प्राप्त झाली. सदर गुन्हयातील पिडीत मुलगी हिचा शोध नाशिक, मुंबई, पुणे, संभाजीनगर येथे घेतला असता मिळुन आले नाही. तपासादरम्यान गुन्हयामधील पिडीत मुलगी ही बाल सुधारक गृह जळगाव खान्देश येथे बाल सुधारक गृहात दाखल असल्याची माहीती गुप्तबातमीदारांकडुन मिळाल्याने मा. वरिष्ठांना माहीती देवुन बाल कल्याण समिती अध्यक्ष जळगाव खान्देश यांचीशी संपर्क साधुन सदर पिडीत मुलीबाबत विचारपुस करून पिडीत मुलीला ताब्यात घेणेकामी जळगाव खान्देश येथे अ.मा.वा. कक्ष अकोला स्टॉप रवाना झालो. बाल कल्याण समिती अध्यक्ष यांना भेटुन गुन्हयाबाबत सविस्तर माहीती देवुन पत्रव्यवहार करून पिडीत मुलीला ताब्यात घेवुन अमावाकक्ष अकोला येथे आलो. पुढील तपासकामी पिडीत मुलगी केस डायरी, केस पेपर पो.स्टे. अकोट शहर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सा, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी सा. शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कामगिरी ही पोनि उज्वला देवकर, सपोनि कविता फुसे, पोउपनि मनोहर वानखडे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, पोहेकॉ धनराज चव्हाण, पोकों प्रदीप उंबरकर, मपोकों पुनम बचे, वाहन चालक पोकॉ अविंद्र खोडे मपोकॉ पुजा चंदन यांनी केली असुन लवकरच इतर गुन्हयामध्ये सुध्दा तत्परतेने पिडीत मुली व आरोपी यांचा कसुन शोध घेऊन गुन्हयांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.