गौरक्षण रोडवरील प्रसिध्द उदयोगपती यांचे बंगल्यातील घरफोडीच्या गुन्हयातील एक आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

अकोला प्रतिनिधी : प्रशिक मेश्राम

दि.०४/०५/२०२४ रोजी पो.स्टे. खदान येथील अप क ३८५/२४ कलम ४५७, ३८० भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे. सदर गुन्हयातील घरफोडी मध्ये सोने, चांदी तसेच रोख असा एकुण ४३,७७,३१७ रूपयाची चोरी झाली होती. सदर गुन्हयाच्या घटनास्थळी मा. पोलिस अधिक्षक सा. अकोला, मा. अप्पर पोलिस अधिक्षक सा. अकोला, व उपविभागीय पालिस अधिकारी, शहर विभाग अकोला व पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला व स्था. गु.शा. येथील पो. स्टाफ यांनी भेट दिली. यावेळी मा. पोलिस अधिक्षक सा. अकोला यांनी लेखी व तोंडी आदेश देवुन सदर गुन्हयात उघडकीस आणनेकामी आदेशीत करून सुचना दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सांगीतले. त्याअनुषंगाने पो.नि. शंकर शेळके, पोउपनि आशिष शिंदे व स्था.गु.शा. येथील यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचा परीसराची पाहणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून गोपनिय माहितीचे आधारे अहमदनगर जिल्हयातुन इसम नामे जिगर कमलाकर पिंपळे वय ३७ वर्ष रा. पाखोरा, ता. गंगापुर, जि. संभाजी नगर यास ताब्यात घेतले. आतापर्यंत केलेल्या चौकशी दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयातील आरोपीतांनी चोरी केलेल्या मुददेमालाची आपसात हिस्से वाटे हे घटनेच्या दिवशी करून वेगवेगळया मार्गाने निघुन गेल्याचे अटक आरोपी याने सांगीतले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह सा, मा.अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. पोउपनि, आशिष शिंदे, ए. एस. आय. दशरथ बोरकर, पाहेकॉ फिरोज खान, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीमोद्दीन, गोकुळ चव्हाण, भास्कर थोत्रे, सुलतान पठाण प्रमोद डोईफोडे, उमेश पराये, रविंद्र खंडारे, पो. कॉ अभिषेक पाठक, धिरज वानखडे, स्वप्नील खेडकर, स्वप्नील चौधरी, उदय शुक्ला, एजाज अहमद, लिलाधर खंडारे, अन्सार अहमद, मोहम्मद आमीर, राहूल गायकवाड सर्व स्था.गु.शा. अकोला तसेच सायबर सेलचे पो.शि. आशिष आमले, गोपाल ठोंबरे व चालक पोहेकॉ. प्रशांत कमलाकर चालक पो. कॉ. विजय कबले, प्रविण कश्यप यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.