अर्जुनाप्रमाणे विद्यार्थ्यांचा ध्येयावर फोकस असावा – डॉ.सुभाषचंद्र कोरपे

श्री शिवाजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न..

स्थानिक: अकोला ,

स्थानिक : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे उन्हाळी परीक्षा २०२२ मध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी वितरण व कौतुक सोहळा आयोजिक केला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ॲड.गजाननराव पुंडकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार मा.प्रकाशभाउ पोहरे, मुख्य संपादक, दै.देशोन्नती हे होते. विशेष उपस्थिती म्हणून मा.डॉ.सुभाषचंद्र कोरपे , प्रा.सुरेशराव राउत, महाविद्यालय विकास समिती सदस्य,  श्री अशोकराव देशमुख, शाळा समिती सदस्य हे होते. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट हे होते. यावेळी व्‍यासपीठावर विज्ञान शाखा प्रमुख डॉ. संजय शेंडे, मानव्‍यविद्या शाखा प्रमुख डॉ.जीवन पवार, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. संजय तिडके आणि गुहविज्ञान शाखा प्रमुख डॉ.अंजली कावरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजन व महापुरुषांच्या हार्रापणाने झाली. यानंतर विद्यपीठ गीत व डॉ.भाउसाहेब देशमुख गौरव गीताने झाली. यावेळी प्रमुख पाहूण्यांचा शॉल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे डॉ.सुभाषचंद्र कोरपे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले – “अर्जुनाला जसा पक्षाचा डोळाचं दिसत होता तसे विद्यार्थ्यांनी आपले ध्येय फोकस करावे , म्हणजे तो आयुष्यात यशस्वी होईल “, उपस्थित गुणवंताचे कौतुक केले तर जे गुणवंताच्या यादीत आले नाहीत त्यांनी पुढील वर्षी आणखी जोमाने प्रयत्न करण्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.कार्यक्रमात सर्व शाखानिहाय गुणवंतांना डिग्री प्रमाणपत्र वितरित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये सबा फातिमा,केमिस्ट्री मधून फर्स्ट मेरीट, एकविरा बोराखडे, पूजा ठाकूर, वैष्णवी सोनवणे, श्रेया जाधव, सागर महल्ले, वैष्णवी वाकोडे, संकेत जामनीक आदींचा समावेश होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी केले. संचालन प्रा.संगीता शेगाकार यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. संजय पोहरे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संजय तिडके यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. यासाठी संगीत विभाग प्रमुख डॉ.किशोर देशमुख, प्रा. हर्षवर्धन मानकर, डॉ. वनिता भोपत यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बेलसरे, डॉ. यादगीरे, डॉ. गीरी, डॉ. आशिष राउत यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.