
श्री शिवाजी महाविद्यालय,अकोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तथा लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
स्थानिक श्री. शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे १ आगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तथा लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट याच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात डॉ. पंजाबराव देशमुख, लोकशाही अण्णाभाऊ साठे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.
या प्रसंगी प्राचार्य डॉ अंबादास कुलट यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य हे दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करणारे आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आपले ध्येय साध्य करावे’ असे आपल्या अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुलभा खर्चे मॅडम, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.जीवन पवार, इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. नाना वानखडे मराठी विभाचे प्रा. डॉ. संजय पोहरे याची होती.
वरील सर्वांनी दोन्ही महापुरुषांचा जीवनपट आपल्या शब्दातून मांडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात कु.संचिता चव्हाण हिने अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. ओम श्रावण, संकेत इंगळे, कु. नेहा तायडे, कु. आचल केकाळे, कु. वैशाली नृपनारायण, कु. प्राजक्ता बुंदे या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनावर भाषण दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्रा. डॉ. श्रद्धा थोरात यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आरती महानकार आणि कु. ऋतुजा मूळे आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.गणेश मेनकार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.साधना यांनी अथक परिश्रम घेतले.