
राष्ट्रीय छात्र सेना ,राष्ट्रीय सेवा योजना, आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादासजी कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून केंद्र संयोजक डॉ. आनंदा काळे होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विवेक हिवरे , माजी इंग्रजी विभाग प्रमुख तथा माजी केंद्र संयोजक हे होते .
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. अनील मेतकर माजी केंद्र संयोजक हे होते . डॉ. डी. बी. वानखडे इंग्रजी विभाग हे होते आपल्या भाषणात बोलत असताना डॉ विवेक हिवरे म्हणाले ‘ शहराच्या प्रगती सोबत खेडीही कोठे मागे पडायला नको यासाठी यशवंतराव चव्हाणांनी कायमच समतोल प्रगतीचा पुरस्कार केलेला दिसतो . यातूनच आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती झाली ‘ असे विचार त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून वक्त केले तर अध्यक्षीय भाषणात डॉ. आनंदा काळे म्हणाले – ‘ आत्मचरित्र जयंती कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. महान व्यक्तीचे आत्मचरित्र, पुस्तके ,त्यांचा जयंती कार्यक्रम, हा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो त्यांच्या जीवनामध्ये आलेले वेगवेगळ्या प्रकारची संकटे त्यांनी केलेला त्याग हा प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवण्याकरता आपण त्यांची आत्मचरित्र त्यांनी लिहिलेले पुस्तके वाचायला पाहिजे आपण सतत वाचन करून ते आपल्या जीवनामध्ये अंगीभुत केले, रुजवले तर आपले जीवन सुद्धा सकारात्मकतेने चांगल्या उंचीपर्यंत पोहोचू शकते म्हणून विद्यार्थ्यांनो यशवंतराव चव्हाणांचे आत्मचरित्र त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम यामधून आपल्याला प्रेरणा मिळून आपले जीवन समृद्ध होऊ शकते असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे डॉ. आनंदा काळे म्हणाले कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून प्रा. किशोर देशमुख , प्रा. एन टी वानखडे डॉ जीवन पवार , डॉ. संजय पोहरे , प्रा. सचिन भुतेकर , डॉ सुलभा खर्चे डॉ. श्रद्धा थोरात , प्रा .हर्षवर्धन मानकर , प्रा. मोहन काळे , प्रा प्रवीण वाघमारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी राष्ट्रीय शास्त्र सेनेचे कॅडेट राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर प्रस्ताविक इंग्रजी विभागाचे प्रा. एकनाथ खेडकर यांनी केले तर प्राध्यापक सदाशिव , दामोदर सर यांनी यावेळी उपस्थित त्यांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता कॅडेट प्रजीत दाभाडे अनिल भाऊ फाले, रावसाहेब काळे, शंकर राठोड संकेत श्रीवास्तव महादेव देशमुख ओम शिंदे ईश्वरी बोळे प्रीती ठाकूर सुरज उंडे मयूर पचांग, मयूर , अनिकेत पचांग सुमित पर्थोट, गौरव पुसे , रोहिणी नीलखन मुक्त विद्यापीठाची विद्यार्थिनी नंदिनी टेवरे समीक्षा तायडे ईश्वरी डांबलकर स्नेहा तायडे धनश्री इघाटे वसुंधरा कानेरकर विकास हाक्कर अमोल बावणे ,मयूर ईचे,सुरज उंडे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे यशस्वी संचलन प्राध्यापक रावसाहेब काळे यांनी आभार प्रदर्शन मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक संतोष पस्तापुरे यांनी केले