सम्राट अशोक गौरव रथ यात्रेला जिल्ह्यातील जनतेचा प्रतिसाद विविध ठिकाणी स्वागत,रॅली,संवाद सभांचे आयोजन..


चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान चे आयोजन

अकोला: भारतातील सुवर्ण युगाचे निर्माते,लोककल्याणकारी धोरण राबविणारे महान शासक सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी 31मार्च 2023 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा महोत्सव सम्राट अशोक पर्व महोत्सव अकोला येथे प्रचंड उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी दिल्ली येथील धम्म क्रांतीचे शिलेदार, दिल्लीचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पालगौतम,भंते ज्ञानज्योती महाथे रो मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत ,अशोक पर्व महोत्सव यशस्वी व्हावा,तसेच सम्राट अशोक यांची गौरव गाथा जनमानसात पोहचावी यासाठी सम्राट अशोक गौरव रथ यात्रा 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान जिल्हाभर काढण्यात आली अकोला जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सम्राट अशोक यांचा गौरव करण्यासाठी ही रथ यात्रा काढण्यात आली
चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान अकोला अध्यक्ष प्रा विजय आठवले यांचे नेतृत्वात आयोजित या रथ यात्रेत
चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे ,उपाध्यक्ष प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे,सचिव प्रा सुनील कांबळे सर,व्यवस्थापक प्रा शैलेश इंगळे प्रा डॉ संदीप भोवते, डॉ विलास तायडे सुरेश गवई निरंजन वाकोडे विद्याधर मोहोड,अनिल गवई ,वासुदेव गवई बी. जी.इंगळे सर मंदाताई शिरसाट साहेबराव आठवले कल्पना महाले रेखाताई चव्हाण वर्षाताई जंजाळ कल्पना खंडारे उज्वला नरवाडे सुशीला दामोदर कविता शिरसाट वंदना रावळे आशाताई इंगळे राजमती खंडारे ,शोभाताई गुडधे सुधा ताई दारोकार यांची उपस्थिती होती.

सम्राट अशोक यांची जयंती,राष्ट्रीय पर्व म्हणून घोषित झाली पाहिजे, ही जयंती शासन प्रशासन,आणि भारतीय जनतेने उत्साहात साजरी केली पाहिजे त्यांच्या प्रतिमा आणि ,अशोक स्तंभ जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील. ग्राम पंचायत , शाळा,महाविद्यालये ,विविध शासकीय , निम शासकीय संस्था या ठिकाणी असेलच पाहिजे यासाठी चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान च्या वतीने सदर जागर अभियान रथ यात्रेच्या माध्यमातून राबविण्यात आले. भारतात शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्रांती घडवून भगवान बुद्धांचे समतेचे विचार जगभर प्रसारित करण्यात सम्राट अशोक यांचे ऐतिहासिक योगदान असून त्यांची प्रतीक,चार सिंहांची शिल्प कृतीअशोक स्तंभ ,अशोक चक्र राष्ट्रीय प्रतीक म्हणून भारताने स्वीकारली आहेत त्यांच्या लोककल्याणकारी धोरणाचा_ भारतीय संविधानावर सुद्धा प्रभाव आहे तरी सुद्धा,शासन,प्रशासन,भारतीय समाज व्यवस्थेत सम्राट अशोक उपेक्षित आहेत.
त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहीत असावा , या हेतूने चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान अकोला चे वतीने*अशोक *पर्व* *महोत्सव होत असून या कार्यक्रमाचा जागर करण्यासाठी सम्राट अशोक यांची ही रथ यात्रा काढण्यात आली , ही यात्रा स्थानिक अशोक वाटिका अकोला येथून 25 फेब्रुवारी रोजी दुपारी दिशा गवई ,संतोष भालदार अड संतोष कोल्हे , नंद किशोर सरदार प्रदीप चोरे भीक्षू संघ उपासक उपसिका इत्यादींच्या उपस्थितीत रथ यात्रा अकोला शहरातून अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन पर्यंत निघाली आ स्टूल येथील महामाया उपासिका संघ व लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले होते सम्राट अशोकांच्या नावाचा गजर करीत यात्रा तब्बल दोन तास अकोला शहरातून निघाली पुढे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक गावात रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले तर अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी संवाद सभा सुद्धा घेण्यात आल्या सम्राट अशोक पर्व महोत्सव साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले सम्राट अशोक रथ यात्रेला जिल्ह्यातील जनतेचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published.