श्री शिवाजी महाविद्यालयाचे ज्ञानोत्सव स्नेहसंमेलनाचे उद्घाटन थाटात संपन्न

स्थानिक: अकोला येथील श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ज्ञानोत्सव 2023 चे उद्घाटन उत्साहात आणि थाटात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाचे उदघाटक म्हणून मुंबई येथील प्रसार माध्यम शिक्षण तज्ञ माननीय महेश सावळे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय एडवोकेट गजाननराव पुंडकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था,  अमरावती हे होते. त्याचप्रमाणे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. प्रा. सुरेश राऊत, मा. प्रशांत भाऊ देशमुख , माननीय अशोकराव देशमुख सदस्य शाळा समिती, मा. महादेवरावजी भुईवार माजी उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती त्याचप्रमाणे रामेश्वर वाकडे, दादाराव पाटील, गंगाधरराव पाटील, डॉ. पंढरी वाटाणे, डॉ. आर्. एन. काळे, डॉ. केशवराव खांडेकर, आदी आजीवन सभासद, तसेच अधीक्षक, श्री अशोक चंदन, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. अश्विनी आसेकर व विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या उद्घाटन पर भाषणात बोलताना महेश सावळे यांनी २० वर्षापूर्वीच्या व आजच्या महाविद्यालयीन प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यासमोर विशद केला आणि शेतकरी शेतमजुरांच्या मुलांमधील कौशल्य त्याला घडविण्याचे संस्कार केंद्र म्हणूनही महाविद्यालयाचा गौरव केला.अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नुकतेच महाविद्यालयाला मिळालेले NAAC मधील नामांकन अ ++  बद्दल शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आणि महाविद्यालयाच्या प्रगतीच्या दृष्टीने हे नामांकन प्रेरणादायी व आदर्श ठरले आहे असे गौरवोद्गार काढले.

 कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास कुलट यांनी केले या प्रसंगी संत गाडगे बाबा मॅनेजमेंट कौंसिल मध्ये नियुक्ती बद्दल महाविद्यालयाच्या वतीने मा. हर्षवर्धन देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमांणे महाविद्याल विकास समिती  सदस्य म्हणून निवडी बाबत प्रा. सुरेश राऊत, श्री प्रशांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी विचारपीठावर महादेवराव भुईभार, रामेश्वर वाकडे, दादाराव पाटील, गंगाधर पाटील, उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक  समिती समन्वयक  डॉ किशोर देशमुख यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय  सांस्कृतिक  समिती सहसमन्वयक डॉ उज्वला लांडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे बहारदार संचालन युवा वक्ता अक्षय राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले यांनी केले. या कार्यक्रमाला कनिष्ठ, वरिष्ठ, महाविद्यालयाचे प्राध्यापक  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.