श्री शिवाजी महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न

अकोला. श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे दि. 20/02/2023 रोजी बी. एस्सी. अंतिम वर्षात प्रवेशित व 2022 बी. एस्सी. पास आऊट विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल द्वारे कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने आपल्या विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख व कौशल्यधारीत शिक्षण हा विभाग देत असतो. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरीची संधी मिळावी म्हणून या विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मोहोड व सर्व सभासद नेहमी प्रयत्नशील असतात. यामध्ये कॉर्निंग इंक. चे एच. आर. जनारालिस्ट अतुल अजणाडकर व रिक्रुटमेंट रिलेशनशिप मॅनेजर मा. ज्ञानेश्वर गोंगले यांच्या कडून विद्यार्थ्यांकरीता या कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ऐकून 134 विद्यार्थ्यांनी मूल्यांकन परीक्षेमध्ये सहभाग घेतला. यानंतर मूल्यांकन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनकरिता त्यांची द्वितीय टेस्ट कंपनी द्वारे लवकरच घेतली जाईल असे सांगण्यात आले.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल चे नव्याने सभासद म्हणून निवड झालेले प्रा. महेश डी. फलके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर सर्व विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल चे समन्वयक डॉ. नितिन मोहोड यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कॅम्पस इंटरव्ह्यू यशस्वी रित्या पार पाडण्याकरिता ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल चे सभासद डॉ. उज्वला लांडे, प्रा. रवि दाभाडे, प्रा. अनुजा मोपारी व प्रा. महेश फलके तसेच ज्ञानेश्र्वर गोंगले, आशिष अंभोरे आदिंचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published.