
स्थानिक: अकोला,
वंचित बहुजन युवा आघाडी अकोला पश्चिम च्या वतीने कर्नाटक राज्यातील बंगलोर येथील जैन युनिव्हर्सिटीतील आयोजित एका कार्यक्रमात जाणीवपूर्वक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अपमानास्पद उल्लेख करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी युट्युब वर जैन युनिव्हर्सिटी बेंगलोर या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत विश्वरत्न भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा चुकीचा व अपमान जनक हेतू पुरसपर जाणीवपूर्वक उच्चारण करण्यात आले डॉ. बी आर आंबेडकर एवजी "बियर "आंबेडकर असे उच्चारून महामानवांचे अपमान करण्यात आले. हे समाजकंटक एवढ्यावरच न थांबता, त्यांनी आपल्या एकांकिकेमध्ये असे म्हटले की एखादी मुलगी "एखाद्या मुलासोबत डेट करण्याकरिता गेल्यास ती त्याला सोबत बसून खाऊ देणार नाही" कारण तो शेड्युल कास्ट म्हणजेच मागासवर्गीय जातीचा असल्यामुळे त्यांच्या या वक्तव्य वरून असे दिसून येते की, ते हेतू परस्पर समाजामध्ये जातीय भेद भाव निर्माण करत आहेत.
जाती धर्मावर भेदभाव निर्माण करणाऱ्या अशा असामाजिक संघटना व व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे जाचक आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका जाती-धर्मा वर्गाचे नसून त्यांचे कार्य संपूर्ण लोक कल्याण करीत आहे. व भारत देशा करीत आहे याची जाणीव संपूर्ण विश्वाला असून सुद्धा ,काही जातीवादी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी किंवा असामाजिक तत्त्वांच्या माध्यमातून अशा महामानवांचा जर अपमान होत असेल तर हा संपूर्ण देशाचा अपमान आहे व त्याचप्रमाणे त्यांच्या एकांकिकेतून असं कळते की ते हेतू पुरसपर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संस्थांमध्ये खच्चीकरण करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याकरिता त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करत आहेत. त्यामुळे बहुतांश लोकांमध्ये अशा अपमान जनक चलचित्र व वक्तव्यामुळे भारतीय राज्यघटने शिल्पकार यांचा झालेला अपमान तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संस्थांमध्ये हेतू पुरसपर करण्यात येत असणारे खच्चीकरण व अपमान हा कदापी सहन केल्या जाणार नाही वरील विषयाला अनुसरून जाहीर निषेध असून या असमाजिक संघटना व तत्व विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे अकोला महानगराध्यक्ष आशिष भाऊ मांगुळकर तथा महासचिव कुणाल भाऊ राऊत यांनी निवेदनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक साहेब यांना केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुजित भाऊ तेलगोटे नंदू भाऊ कोल्हटकर लखन भाऊ वाकोडे प्रमोद भारसाकळे शैलेश डोंगरे प्रवीण बोरकर अभिजीत यादव बंटी गायकवाड साहिल नागोसे सुमित भांबोरे शिवा शिरसाठ अक्षय गोपनारायण आदित्य गायकवाड अक्षय भालेराव कैलास प्रधान इत्यादींन सह अनेक कार्यकर्ते उपस्तीत होते.