
नव्या मनूला गाढण्यास त्या
सज्जआता रे होऊया
अन्यायाचा अंधार भेदून
चला प्रकाशा कडे जाऊया।।धृ।।
भिमरायाच्या एका हाकेने, धम्मामध्ये न्हालो आपण
तया प्रतीचा नाही गवसला, सापडे न मेरू आजही शोधून, रक्तामधले नाते तुमचे
आले तुम्हाला ताराया।।१।।
चला प्रकाशा कडे जाऊया
खूप मांजरे पाहिली आपण ताटाखाली त्यांनी किती बसावे। श्वानाची जर वाकडी शेपूट
तिला आम्ही किती सरळ करावे।।
एक हाक ती भिमरायांची ,
14 ऑक्टोबर फुले धम्म मळा।
भीमा कोरेगाव निषेधासाठी महाराष्ट्र कसा बंद झाला।।
प्रकाशा चीआलीएकशलाका,
उठले सारे साथ द्याया
अन्यायाचा अंधार भेदून
चला प्रकाशा कडे जाऊया चला प्रकाशाकडे जाऊया ।।२।।
नकाच आता फिरवून घेऊ,
हात उगा ते पाठीवरूनी।
तुम्हास पोकळ मायादावून अन् शोधतील त्यांच्या वळचणी।।
आता आम्हाला कळून आले नाका पुढची त्यांची दिशा। स्वार्थापोटी त्यांची लालूच
आमची का मग दुर्दशा।।
एक होऊनी क्रांती करूया, प्रकाशा मध्ये आपण न्हाऊया
अन्यायाचा अंधार भेदून
चला प्रकाशा कडे जाऊया।३
अंगी चेतवा धम्मदिप तो
भारतास मग मिळे प्रकाश । चला स्वीकारा नवाकंठमणी, धरती आमची आमचे आकाश। प्रस्थापितांच्या संघर्षाला। भिमरायांनी दिधले उत्तर ।
रक्षण करूया संविधानाचे
पानंपान ठेऊ अजारामर।। दिल्लीचेही तक्त मिळाया,
शेळीनको आता वाघबनाया अन्यायाचा अंधार भेदून
चला प्रकाशा कडे जाऊया।४
तुम्हा तारण्या रक्तामधले
नाते आले बघा धावूनी। मनुवाद्यांच्या संघर्षाशी ,
लढे प्रकाश जीवओतूनी
नजरेत शिवशाहूभिमराव आठवण त्यांची सदा करा आईबापासम दिधली माया
नाव तयांचे ह्रदयी स्मरा।।
प्रकाशा चा उजेडआपल्या मनामनामध्ये जागऊया। अन्यायाचा अंधार भेदून
चला प्रकाशा कडे जाऊया।५।
दास आम्हाला नको कोणीही
विषारीसंगतीत राम नाही।
रक्ताचे नातेच आम्हा
स्वच्छ प्रकाश देईल ऊभारी।। उठआता तरी जागा हो
अंधारातून प्रकाशा त ये।
शक्ति भिमाची तुझ्यात येण्या मिळेल तेवढे ऊर्जा घे, ।।
याद ठेवारे सत्याग्रहाची
मिळेल तुम्हा बळ लढाया।।७।।
अन्यायाचा अंधार भेदून,
चला प्रकाशा कडे जाऊया ।।
चला प्रकाशा कडे जाऊया।।
धन्यवाद…
डी.एस.कौशल सर
(रेडिओ टिव्हिस्टार)
कवी, गायक
जि.प. शिक्षक ,
कोल्हापूर
शाहूनगरी ९६३७१६८०३३