
स्थानिक: अकोला येथील बार असोसिएशन च्या नुकताच ९ फेब्रुवारी २०२३ रोजी अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यात हेमसिंग मोहता यांनी ५५६ मते मिळवली व प्रवीण तायडे यांनी ५९२ मते मिळवून त्यांचा ३६ मतांनी पराभव करत अध्यक्ष पदावर विराजमान झाले. तर यांनी ७६३ मते घेवून उपाध्यक्ष पदी देवाशिष काकड हे निवडून आले. ॲड. अरुणा गुल्हाने यांनी ५२५ मते घेवून महिला उपाध्यक्ष पदी व सह सचिव पदावर ॲड. सतीश शर्मा ३३९ मतांनी निवडून आले. निवडून आलेल्या उमेदवार यांचा विजयाचा जल्लोष हा पाहण्या सारखा होता. तेव्हा अनेक स्तरावरुन सदर उमेदवारांना शुभेच्छा देवून अभिनंदन केल्या जात आहे.
