
.
अकोला-स्थानिक गाडगे नगर हमजा प्लॉट येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्या रशिदा परवीन उर्फ रुबिना खान यांची साहित्य आणि विविध भाषांमधील अमूल्य योगदान लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,या पदावर विदर्भ प्रदेशाध्यक्ष मिलिंद रंगारी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर यांनी रशिदा परवीन यांची नियुक्ती केली आहे.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली आहे. यासोबतच साहित्य परिषदेचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत नेण्यासाठी आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी त्या आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करतील, अशी अपेक्षा आहे.रशेदा परवीन यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ज्यामध्ये अफरोज खान, खालिदा बी, फातिमा परवीन, मोहिउद्दीन, नसरीन बानो आणि अफान मलिक यांचा विशेष समावेश आहे.