महापुरुषांच्या बद्दल अपशब्द बोलल्यामुळे अकोट मध्ये एकजुटीने करण्यात आला निषेध..

अकोट: दि.१६डिसेंबर २२ ला सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,आकोट येथे जमा होऊन राज्यपाल व चेंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील आदर्श नेत्यांचा व महापुरुष यांचा केलेल्या अपमानचा निषेध काळ्या पट्ट्या बांधून व काळे रूमाल घेऊन करण्यात आला त्याच प्रमाणे त्याचे विरोधात गुन्हे दाखल करण्याचा रिपोर्ट पोलीस स्टेशन आकोट येथे सर्व पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते संघटना यांनी देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक,आकोट ह्या ठिकाणी सर्व पक्षीय पदाधिकारी समस्त सामाजिक कार्येकर्ते व संघटना.आकोट यांनी भाजप वगळता सर्वपक्षिय निषेध करून भगतशिंग कोशारी व चंद्रकांत पाटील यांचा रिपोर्ट देण्यात आला.

उपस्थिती वंचित बहुजन आघाडी आकोट शहर पदाधिकारी महिला आघाडी शिवसेना चे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी चे सर्व पदाधिकारी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी प्रहार चे पदाधिकारी शेतकरी पॅनल चे सर्व पदाधिकारी महात्मा जोतिराव फुले संघटना,सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते सर्व उपस्थित होते व या निषेध ला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला

Leave a Reply

Your email address will not be published.