खेड्यातलं येड प्रेम चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता..

मुंबई पुणे कोल्हापूर प्रमाणेच विदर्भातील कलाकवंतही आता फिल्म सिटी चमकणार आहेत. अशोक श्रीरामजी पाटील यांनी निर्माण केलेला खेड्यातलं येडं प्रेम हा मराठी चित्रपट 30 जून 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. खेड्यातलं येड प्रेम या चित्रपटाची कथा ग्रामीण व शहरी भागाची उत्कृष्टपणे सांगड घालून माणिक गवई यांनी अतिशय विनोदी पद्धतीने पटकथाही लिहिली आहे. विदर्भातील मातीचा गंध असलेले संवाद आणि तरुणांच्या काळजाचा ठाव घेणारी गाणीही माणिक गवई यांनी लिहिली आहेत. संगीत प्रेमचंद कांबळे यांचे असून चित्रपटाची गाणी शिवाजी साठे व मंजुषा कांबळे यांनी गायली आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन कृष्ण गोपाल वानखेडे यांनी केले असून ते एका विशेष भूमिकेत चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे “धुमधडाका ” दे दना दन फेम प्रेमाकिरण एका आगळ्यावेगळ्या भूमिकेसह विदर्भातील प्रगती पाटील, मयूर ,संदीप, दिशा ,स्वप्नाली बंड ,सुवर्णपाल डोंगरे, रवी नवालकर, श्याम पिंपळकर ,डॉक्टर राजकुमार वैराळे, एडवोकेट बॉबी देशमुख, राहुल वानखडे ,सुशीला घुगे ,भागवत केंद्रे ,दिनेश डोंगरे, प्रीतम पिंपळकर ,विमल भगत, ललिता भगत, इत्यादी कलावंतांनी उत्कृष्ट भूमिका साकारले असून चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन निलेश वानखडे यांनी केले आहे. तर सहदिग्दर्शक म्हणून सुवर्णपाल डोंगरे यांनी उत्कृष्टपणे बाजू सांभाळली आहे .सहनिर्माता म्हणून विमल भगत यांनी चोखपणे कामगिरी बजावली आहे. चित्रपटाच्या पोस्टर व ट्रेलर लाँच सोहळ्याचा कार्यक्रम दिनांक 9 जून ला बोरगाव मंजू येथील संत गजानन महाराज मंदिर सभागृहात माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. खेड्यातलं येडं प्रेम हा चित्रपट प्रेक्षकांनी अवश्य पहावा असे आवाहन खेड्यातलं येड प्रेम च्या टिम ने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.