वंचितच्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यात यश ,अभय योजना लागू..

टॅक्स वसुली करणाऱ्या स्वाती इंडस्ट्रीची चौकशी करणार – आयुक्त

अकोला, दि. १४ – स्वाती इंडस्ट्रीज मार्फत अकोल्यात सुरू असलेल्या अवैध टॅक्स वसुली संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनाला पहिल्या टप्प्यात यश मिळाले. मनपा आयुक्तांनी स्वाती इंडस्ट्रीजची चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, अभय योजना तात्काळ लागू करण्यात आली आहे. या प्रश्नाकडे मनपाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अकोला शहरात 36 केंद्रावर स्वाक्षरी मोहीम तसेच एक मिस कॉल योजना राबविण्यात आली होती, या आंदोलनाला अकोलेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
नागरिकांनी एक लाख पेक्षा अधिक स्वाक्षऱ्या आणि एक लाख तीस हजार मिस्कॉल द्वारे सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दिला. मनपा आयुक्त लहाने यांनी शास्ती अभय योजना आजच लागू केल्याची माहिती वंचितच्या शिष्टमंडळाला दिली.


वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, निलेश देव, शंकरराव इंगळे, अरुंधती ताई शिरसाठ, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्त सुनील लहाने यांची आंदोलन झाल्यानंतर भेट घेतली व त्यांना एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन स्वाधीन केले.
अकोल्यातील जनेतेने भाजप नेत्यांना, आमदारांना, नगरसेवकांना काही बेसिक प्रश्न विचारावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले होते. टॅक्स वसुलीचे काम स्वाती इंडस्ट्रीजलाच का दिले, यासाठी भाजप विरोध का करीत नाही,? सामान्य जनतेने महानगरपालिकेत 100 रुपये भरल्यानंतर त्यापैकी 8 रुपये 39 पैसे कंत्राटदाराच्या घशात का घालत आहेत, ? थेट टॅक्स भरणाऱ्या 50% अकोलेकरांना दहा टक्के सूट का नाही, ? स्वाती इंडस्ट्रीज मध्ये भाजपचे कोणते नेते भागीदार आहेत, तत्कालीन पालिका आयुक्त कविता दिवेदी यांच्याकडे प्रशासक पदाचा पदभार असताना त्यांनी कर वसुलीचे खाजगीकरण करत 1500 कोटीचा ठेका स्वाती इंडस्ट्रीजला देताना भाजपने का विरोध केला नाही, जास्तीचा मालमत्ता कर थोपवून भाजप सत्ता काळात अकोले करांची लूट का करीत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोल्यातच खाजगीकरण का केले त्यांनी मुंबई ठाण्यात खाजगीकरण का केले नाही, टॅक्स वसुलीच्या नावाखाली स्वाती इंडस्ट्रीजचे कर्मचारी अकोले करांना घरात घुसून दमदाटी करत आहेत त्याबद्दल भाजपचे नेते गप्प का असे अनेक प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आंदोलनादरम्यान विचारले. अकोलेकरांची लूट करणारे मनपाचे अधिकारी स्वाती इंडस्ट्रीज यांचे संगणमत असून वंचित बहुजन आघाडीने आज शहरभर उभारलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला हे विशेष. एक लाख सह्यांचे निवेदन आयुक्तांना दिल्यानंतर त्याची दुय्यम प्रत मुख्यमंत्र्यांना सुद्धा स्कॅन करून पाठविण्यात आली.
महानगरपालिकेच्या मुख्य द्वारासमोर राबवलेल्या आंदोलनामध्ये
राजेंद्र पातोडे, अरुंधतीताई शिरसाट, प्रमोद देंडवे,प्रभाताई शिरसाट,मिलिंद इंगळे, मजहर खान, वंदनाताई वासनिक,जि प अध्यक्ष संगीता अढाऊ,प्रा संतोष हुशे,जि प उपाध्यक्ष सुनिल फाटकर, सभापती आम्रपालीताई खंडारे, पुष्पाताई इंगळे, किरणताई बोराखडे, गजानन गवई,सिमांत तायडे,मनोहर बनसोड,ऍड नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, विकास सदांशिव,पराग गवई, प्रदीप चोरे,बबलु पातोडे, बुध्दरत्न इंगोले,सरलाताई मेश्राम,कीशोर मानवटकर, कुणाल राऊत, मनोहर पंजवाणी,महेंद्र डोंगरे,मनोज शिरसाट, पुरषोत्तम वानखडे, गुरूदेव पळसपगार,सुनिल शिराळे,जय तायडे,वैभव खडसे , नागेश उमाळे, राजेश मोरे, आकाश भगत, आकाश गवई, पप्पू मोरे, ज्योती खिल्लारे, सुरेश मोरे,मायाताई इंगळे, आशिष मांगुळकर, महेश शर्मा, सुरेश कलोरे, मंदाताई शिरसाट, नितेश किर्तक, भाऊसाहेब थोरात आकाश शिरसाट विशाल नंदागवळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.