वरली मटक्याचे आकडयावर लोकांकडुन पैशे घेवुन खायवाडी करणाऱ्या चार इसमांवर बाळापूर पोलिसांची कार्यवाही

बाळापूर: दिनांक. २४/०८/२०२४ रोजी गोकुल राज जी, सहाय्यक पोलीस अधिक्षक, नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बाळापुर अकोला यांना गुप्त बातमी दाराकडुन माहीती मिळाली की, काही इसम आठवडीबाजार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाजवळ बाळापुर येथे सार्वजनिक ठिकाणी कल्यान नावाचे वरली मटक्याचे आकडयावर लोकांकडुन पैशे घेवुन खायवाडी करीत आहेत. वरून IPS गोकुल राज जी, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांचे मार्गदर्शनात पो. हे. कॉ. अनंत सुरवाडे, संतोष सोळंके, संतोष करांगळे, ना.पो.कॉ सतिश वाडेकर, पो.कॉ. विठ्ठल उकर्डे, गजानन शिंदे यांनी पंचासमक्ष आठवडीबाजार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहजवळ बाळापुर येथे जुगार रेड केला असता आरोपी १) अशोक भिकाजी हसुलकर वय ३२ वर्षे, रा. लोटनापुर बाळापुर, २) शेषराव नामदेव भारसाकळे वय ३८ वर्षे, रा. बल्लोचपुरा बाळापुर, ३) शांताराम महादेव भारसाकळे वय ४८ वर्षे, रा. लोटनापुर बाळापुर, ४) अशोक मुरलीधर जोध वय ६२ वर्षे, रा. जुनेशहर बाळापुर यांचे ताब्यातुन नगदी २०५८०-/रू. वेगवेगळया कंपनीचे तिन मोबाईल किंमत अं. १९८००/- रू. व वरली मटका चिठठी पटटी (जगार साहित्य) असा एकुण ४०३८०/- रू. चा मुददेमाल पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातुन जप्त केला. नमुद आरोपीचे कृत्य कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे होत असल्याने पो.स्टे. बाळापुर जि. अकोला येथे अप नं. ४७४/२०२४ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक, बच्चन सिंह IPS अकोला यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.