
स्थानिक/अकोला दि.१५ /०१/२०२५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानअंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क मध्ये सोमवार दि. १३ रोजी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.
यावेळी खंडेलवाल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मिलिंद शिरभाते यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाकळे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील पिपिटी सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच.बी. नाननाला होते. तर समाजकार्य विभागाच्या विभागप्रमुख डॉ. जया वजिरे, प्रा. श्रावण खंडारे, प्रा. महेश यादव, प्रा. रोहन माकोडे, सत्यशील घ्यारे, सरोज धुंदळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पूनम चिखलकर यांनी केले आणि प्रास्ताविकेतून डॉ. जया वाजिरे यांनी कार्यशाळेची रुपरेषा मांडली. नविन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर डॉ. शिरभाते यांनी पिपिटीच्या माध्यमातून नविन शैक्षणिक धोरणाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसनही केले. प्राचार्य डॉ. एच. बी. नानवाला यांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. कोमल आठवले यांनी केले. कार्यशाळेला शहरातील विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.