
अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथे संपन्न झाला या मेळाव्याला गावाकऱ्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या मेळाव्यात मोठ्या संख्यने पक्ष प्रवेश झाले याप्रसंगी वानेगाव, मोठी शेरोडी, डोंगरगाव शिव या गावात ग्राम शाखेचे अनावरण करण्यात आले मेळाव्याच्या उदघाट्क म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव अरुधती ताई सिरसाट होत्या त्यावेळी त्यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभाकर मामा बकले तर प्रमुख उपस्थिती म्हणून महिला जिल्हा अध्यक्ष लताताई बमणे युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड, भैय्यासाहेब जाधव, सतीश सुरडकर रामदास वाघमारे आदीचीं उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सह संघटक मनोज जाधव संघटक महेंद्र गडवे तालुका अध्यक्ष सांडू श्रीखंडे पपाजी जाधव शाखाअध्यक्ष सुधीर जाधव शाखाउपाध्यक्ष सागर शेजवळ सचिव जितेंद्र जाधव रमेश गायकवाड सोमीनाथ शेजवल बाळू गाडेकर आदींनी केले होते.