श्री शिवाजी महाविद्यालयांमध्ये महिला दिन संपन्न

स्थानिक /अकोला

श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. तुलिका सिन्हा सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ अकोला, प्रमुख उपस्थिती म्हणून वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.प्रतीक्षा कोकाटे, बायो केमिस्ट्री विभाग प्रमुख प्रा संजीव पाटील मराठी विभाग प्रमुख डॉ. सुलभा खर्चे, इलेक्ट्रॉनिक विभागाचे डॉ.अंजली देशमुख. उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते डॉ. तुलिका सिन्हा यांनी उपस्थित सर्व महिलांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना उद्भवणाऱ्या समस्याचे निवारण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास कुलट यांनी महिला महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम केल्याबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनींना रँक वाटप करण्यात आले तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी हिला मिस महाराष्ट्र म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सत्कार करण्यात आले.व निबंध स्पर्धेतील बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मोनाली म्हसाळ यांनी केले तर संचालन राजेश्वरी सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन धनश्री पांडे यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापिका व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.