अकोला: दि.24/4/2023
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे सुप्रसिद्ध नाटककार व कवी विल्यम शेक्सपियर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर नीलिमा तिडके होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एकनाथ खेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. वैभव निंबाळकर यांनी केलेइंग्रजी साहित्याचे विद्यार्थी दर्शना रत्नपारखी , प्रियंका पवार,भक्ती पुट्टी, अरविंद अंभोरे व साक्षी आपोतीकर यांनी शेक्सपियरच्या विविध लेखनाचा आढावा घेऊन त्यातील वैश्विक मूल्यांवर प्रकाश टाकला.आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर नीलिमा तिडके यांनी शेक्सपियर चे इंग्रजी वाङ्मयातील योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती देऊन शेक्सपियर चे साहित्य कालातीत,शाश्वत आणि वैश्विक मूल्यांचे कसे आहे हे शेक्सपियरच्या विविध नाटकातील सुभाषिते सांगून त्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला डॉ. कपिला म्हैसने व प्रवीण वाघमारे हे उपस्थित होते .वरील कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांच्या मार्गदर्शनात पार पडला