अकोल्यात घडतो आहे कुस्तीचा इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक भव्य विदर्भ स्तरीय व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन
स्थानिक: अकोला येथील स्वराज भवन या ठिकाणी दिनांक १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर चषक भव्य विदर्भ स्तरीय व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले आहे. महाराष्ट्र केसरी चॅम्पियन असणारे पैलवान आकाश संजय इंगळे यांच्या नेतृत्त्वात नूतन बौद्ध आखाडा भिमनगर , हनुमान व्यायाम शाळा पोळा चौक , संत गाडगेबाबा कुस्ती केंद्र शिवाजीनगर , सम्राट आखाडा गुलजारपुरा, पंचमुखी कुस्ती केंद्र हरिहर पेठ तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ वरिष्ठ पहिलवान यांनी संयुक्तरित्या सदर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन्ही गटांसाठी खुली असणार आहे. त्यात विविध वजन गटात स्पर्धक भाग घेवू शकतात. त्यानुसार विजेत्यांना विविध बक्षिसे देखील देण्यात येणार असून राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रथम पारितोषिक हे हे 51 हजार रोख रुपये असून सोबत चांदीचा मानाचा गधा देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सोबत द्वितीय 31 हजार तर तृतीय अकरा हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून अनेक पहिलवान अकोला जिल्ह्यात दाखल होणार आहे.म्हणून कुस्तीचा एक नवीनच इतिहास अकोल्यात घडेल असे आयोजकाच्या वतीने सांगण्यात येत आहे. आयोजन समितीने महाराष्ट्रभरातल्या सर्व पुरुष व महिला कुस्तीपटूंना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.