
महिलेची तब्बेत नाजूक असल्यामुळे लखन इंगळे व मेजर मंगेश तेलगोटे यांनी घेतली अकोला जिल्हा रुग्णालयात धाव..
स्थानिक : अकोट येथील गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले आंदोलनकर्ते वंचित चे आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी आकोट वरून अकोला येथे एका 28 वर्षीय महिलेला ऍडमिट केले असता सदर महिलेची तब्बेत फार नाजूक असल्यामुळे ब्लड देणे गरजेचे होते. ही माहिती लखन इंगळे यांना रुग्णाचे नातेवाईक यांनी सांगितले.
समाज सेवक लखन इंगळे व त्यांचे मित्र मेजर मंगेश तेलगोटे हे सुट्टीवर आलेले होते त्यांना ही बाब लक्षात येताच अकोला जिल्हा रुग्णालय येथे धाव घेतली व रुग्ण असलेल्या महिलेला ब्लड देऊन जीवनदान दिले. तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते व त्यांनी मेजर मंगेश तेलगोटे व वंचितचे लखन इंगळे यांचे आभार मानले.