शहरातील बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांवर मोठी कारवाई; १.८१ लाखांचा दंड वसूल – वाहतूक शाखेची विशेष मोहीम

अकोला (प्रतिनिधी) –शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची शिस्त हरवत चालली असताना, अकोला पोलिस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या आदेशावरून आणि वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या नेतृत्वात, ३० जुलै २०२५ रोजी शहरात बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली.या कारवाईत तब्बल १११ प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवून ₹१,८१,४००/- दंडाची वसुली करण्यात आली आहे.

मुख्य भागात एकाचवेळी तपासणीही मोहीम बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन चौक तसेच शहरातील अन्य प्रमुख रस्त्यांवर एकाचवेळी राबवण्यात आली. तपासणी दरम्यान वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या ऑटो रिक्षाचालकांची गर्दी दिसून आली.यातून वाहतूक यंत्रणेचे पूर्वीचे दुर्लक्षही स्पष्ट झाले.

कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले?कारवाईदरम्यान खालील प्रकारच्या नियमभंगांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली

:नियमभंगाचा प्रकार प्रकरणांची संख्याअवैध प्रवासी वाहतूक 14पुढील सिटवर प्रवासी बसवणे 27सिग्नल जंपिंग 27परवाना जवळ न बाळगणे 2विना गणवेश ऑटो चालविणे 58सार्वजनिक ठिकाणी वाहन सोडणे 2विना नंबर प्लेट वाहन चालविणे 1

एकूण प्रकरणे: १११ | दंड रक्कम: ₹१,८१,४००/-

वाहतूक पोलिसांचं आवाहन की जबाबदारी टाळण्याचं साधन?वाहतूक पोलिसांकडून जारी निवेदनानुसार,“ऑटो रिक्षाचालकांनी पुढील काळात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहन परवाना, विमा, फिटनेस प्रमाणपत्र, गणवेश इत्यादी कागदपत्रे कायम जवळ बाळगावीत. कोणताही दंड पेंडिंग असल्यास तत्काळ भरावा. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.”

..पण एक प्रश्न अनुत्तरित या कारवाईने काहीसा शिस्तीचा इशारा दिला असला, तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर नियमभंग घडू शकतो, यावर वाहतूक यंत्रणेने आधी पावले का उचलली नाहीत?शहरातील गजबजलेल्या चौकात रोजच्या रोज बेशिस्त वाहतुकीचे ‘लाइव सीन’ दिसतात, आणि कारवाई होते महिन्यातून एकदा…यावर प्रशासनानेही विचार करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.