स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील प्राणीशास्त्र विभागातर्फे दि २ ऑगस्ट २०२३ रोजी जागतिक व्याघ्र दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने श्री शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथील सहयोगी प्राध्यापक डॉ मिलिंद शिरभाते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अंबादास कुलट होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ आशिष राऊत व डॉ किशोर पुरी उपस्थित होते. डॉ मिलिंद शिरभाते यांनी आपल्या व्याख्यानातून मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि जंगल आणि वाघांचा परस्पर संबंध फार घनिष्ठ आहे . वाघाला जर वाचवायचे असेल तर जंगलाला वाचवणे अति आवश्यक आहे. आपल्या व्याख्यानांमध्ये शिरभाते यांनी वाघाच्या वर्तवणूकी बद्दल विविध पैलू उलघडून दाखविले. तसेच वाघाच्या पायाच्या ठशावरून वाघाचे वय , वाघाचे लिंग कसे ओळखतात हे त्यांनी समजावून सांगितले. दोन जंगलामधील जोडमार्ग हा वाघाच्या अधिवासासाठी किती महत्वपूर्ण आहे याविषयावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला डॉ आशिष राऊत व प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ प्रकाश आडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत सपकाळ तर आभार प्रदर्शन डॉ प्रियंका रामटेके यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ तुषार देशमुख, डॉ उज्वला लांडे, डॉ शुभांगी गावंडे, श्री भटकर व श्री अलोणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.