“आम्ही सत्ता मिळवण्यासाठी नाही, समाज बदलण्यासाठी लढतो!”
अकोला(व्याळा);आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीची भव्य आणि उत्स्फूर्त बैठक व्याळा येथे श्री हनुमान संस्थान येथे संपन्न झाली. या बैठकीत “मागील अपयशातून धडा घेऊन, आता तीनही जागा बहुमताने जिंकायच्या” असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
बैठकीचे मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा समन्वयक अॅड. एस. एन. खतीब यांनी केले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की –
👉 “आम्ही सत्ता मिळवण्यासाठी नाही, समाज बदलण्यासाठी लढतो. बहुजन, शेतकरी, महिलांचा आवाज दाबणाऱ्यांना आम्ही गप्प बसू देणार नाही!”
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे होते. त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, महिला तालुकाध्यक्ष अनुराधाताई डांगे, महिला महासचिव जाहिदाबी, युवक उपाध्यक्ष स्वप्नील वानखडे, ज्येष्ठ नेते प्रदीप शिरसाट, गौतम शिरसाट, श्यामलाल लोथ, मायादेवी लोथ, गजानन दांदळे यांच्यासह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
“जनतेच्या खांद्याला खांदा लावून, वंचितांचा लढा अधिक तीव्र करणार” असा निर्धार कार्यकर्त्यांनी जाहीर केला.
व्याळा, रिधोरा, कानेरी, गायगाव, दधम यांसह सर्कलमधील शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती या बैठकीत होती. संपूर्ण सर्कलमधील कार्यकर्त्यांनी एकमुखाने घोषणा दिल्या –
📢 “बहुजनांचा हक्क हिरावू देणार नाही!”
📢 “वंचितांचा प्रकाश, समाजासाठी लढा खास!”
बैठकीचे सूत्रसंचालन गजानन दांदळे यांनी केले. प्रास्ताविक मंगेश गवई यांनी तर आभार प्रदर्शन संतोष कात्रे यांनी केले.

