मतदान यादीत तुमचे नाव नाही घरबसल्या मोबाईलवर तपासा यादीत आपले नाव इथे जाणून घ्या प्रक्रिया?

सर्वात आधी आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.eci.gov.in वर लॉग इन करावे लागेल. जसे तुम्ही ही वेबसाईट उघडल्यानंतर होम पेजवर पोहचाल. त्यानंतर डाव्या बाजूला थोडे खाली गेल्यानंतर Search Your Name in Voter List हा पर्याय दिसू लागेल. त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आणखी एक पेज तुमच्यासमोर संगणकावर उघडेल. ज्यात तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. त्यानंतर राज्याची निवड केल्यानंतर एक आणखी पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तेथे आपला EPIC (Electors Photo Identity Card) नंबर टाकावा. त्यानंतर कॅप्चा विचारला जाईल. कॅप्चा भरल्यानंतर तुमचे नाव जर मतदार यादीत दिसेल त्यावर तूमची संपूर्ण माहिती देखील दिसेल. तुम्ही या पेजचे प्रिंटआऊट देखील काढू शकता. ज्यात तुमच्या पोलिंग बूथची आणि अन्य माहिती दिलेली असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.