दृष्टीदिव्यांग महिला सबलीकरण शिबिराचे आयोजन करून साजरा केला जागतिक महिला दिन

(राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, विभागीय शाखा अमरावतीचे आयोजन)

अकोला –
दृष्टीदिव्यांगांसाठी तत्परतेने कार्य करणारी दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संघटनेच्या विभागीय शाखा, अमरावतीच्या वतीने रोकडे मंगल कार्यालय, महसूल कॉलनी, अकोला येथे दि. १५ व १६ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने दृष्टीदिव्यांग महिलांसाठी द्विदिवसीय महिला सबलीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिरांतर्गत विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
पहिल्या दिवशी दि. १५ मार्च २०२५ रोजी दृष्टीदिव्यांग महिला सबलीकरण शिबिराचे उदघाटन हे पोलीस इन्स्पेक्टर सौ. नैना शेखर पोहेकर (दामिनी पथक प्रमुख, महाराष्ट्र पोलीस) यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रघुनाथ बारड (अध्यक्ष, रा.दृ.संघ, महाराष्ट्र) यांनी भूषविले आणि कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लि. चे अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, बँक ऑफ इंडिया, अकोलाच्या व्यवस्थिपिका पुजा चिपळे, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला सचिव विनय वर्मा, रोटरी क्लब ईस्टच्या पुनम मुंधळा, आशिष रोहडा आणि भाविका रोहडा, राज्यकार्यकारिणी उपाध्यक्ष योगेश चौधरी, संजय घोडेराव आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या पहिल्या सत्रामध्ये डॉ. शुभांगी बिहाळे यांनी उपस्थित महिलांना स्त्रियांच्या त्वचा रोगविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर आहारतज्ञ कु. प्राची वाघमारे यांनी उपस्थितांना संतुलित आहाराविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. भाविका रोहाडा यांचा वाढदिवस असल्याने केक कापून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी दि १६ मार्च २०२५ रोजी कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राला महिलांसाठी पॅरा गोल बॉल या खेळाचे प्रशिक्षण देऊन उत्साहपुर्ण वातावरणात खेळ खेळून सुरुवात करण्यात आली, या पॅरा गोल बॉल खेळाचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय खेळाडू आरती लिमजे आणि सुवर्णा जोशी यांनी दिले. खेळानंतर महिलांसाठी रोटरी क्लब नॉर्थचे श्री. प्रविण ढोणे यांच्या वतीने महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले, त्यानंतर डॉ. शोभा पाण्डव यांनी केस गळती याविषयावर महिलांना मार्गदर्शन केले. दुपारी ०२.०० वाजता जागतिक महिला दिन सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरु झाला, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. ममता अग्रवाल (अध्यक्ष, अग्रवाल महिला मंडळ, अकोला) या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन श्वेता गुप्ता, मीना कौर, रा.दृ. संघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भोजराज पाटील, माजी सचिव किशोर गोहील, शुभदा पटवर्धन, रोकडे मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक दिलीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
दृष्टी असलेल्या महिलांपेक्षा दृष्टीदिव्यांग असतांना ही उत्तमरित्या कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल मंचावर उपस्थित मान्यवरांनी रा.दृ.संघ महाराष्ट्र राखीव महिला कार्यकारिणी सदस्या सौ. वनिता डोंगरे व विभागीय शाखेचे सचिव राहुल डोंगरे यांचा शाल, श्रीफळ व साडी देऊन सत्कार केला व यापुढे ही राष्ट्रीय दृष्टीहीन संघास सहकार्य लागल्यास सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले. या द्विदिवसीय कार्यक्रमात एकुण १५० महिला उपस्थित राहिल्या असुन त्यांच्या चहा-नास्त्याची व्यवस्था अर्हम युवा ग्रुप, अकोला यांनी केली, भोजनाची व्यवस्था ही रोटरी क्लब ईस्ट आणि श्री. संतोष खंडेलवाल यांनी केली असुन अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. ममता अग्रवाल व जनामल स्मॉल फायनान्सचे श्री. दळवी सर यांच्याकडून उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तुचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय शाखेचे अध्यक्ष अजय भोजणे, मानद अध्यक्ष सुरेश मुंधडा, महासचिव गजानन राठोड, सचिव राहुल डोंगरे, कार्यालयीन सचिव अनिल बोरकर यांनी अथक परिश्रम घेतले असुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वनिता डोंगरे व मंदा पाटील, स्वागतगीत कु. दुर्गा गवई तर श्रीमती जया वाघमारे सर्व मान्यवरांचे, दानदात्यांचे व उपस्थित महिलांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.