
स्थानिक:अकोला
महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त अकोला पोलीस दला तर्फे भव्य प्रदर्शनी व जनजागृती सप्ताह साजरा होत आहे. विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी व सामाजिक संघटना तसेच सुजाण नागरिक या प्रदर्शनीला भेटी देत आहे.
श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयीन कला विभागाच्या विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रदर्शनीला भेट दिली.प्रदर्शनीचे विषय पुढील प्रमाणे होत- चित्र प्रदर्शनी, बॉम्ब शोधक ,नाशक पथक,फिंगर युनिट, वाहतूक सुरक्षा,डायल ११२,सायबर जागृती, दामिनी पथक, पथनाट्य,सक्षम उपक्रम, पोलिसांची पदके, पोलीस गणवेश, पोलीसांची वाहने, बिनतारी संदेश यंत्रणा, पोलीस मित्र यावर निबंध,वरीष्ठ पोलीस संवाद, भरोसा सेल, डॉग युनिट, प्रसिध्दी पत्रक ,VISA/पासपोर्ट प्रदर्शनी मध्ये प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.

पोलीसांना प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले.विद्यार्थ्यांना प्रदर्शनी पर्यंत नेण्याची जबाबदारी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.सुशीला मळसने व कला विभाग प्रमुख डॉ.अर्चना पोटे यांनी स्विकारली होती.