
प्रतिनिधी / १५ एप्रिल
अकोला:
महामानव, भारतरत्न,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त स्थानिक अकोट फैल पोलिस स्टेशन समोर लाडिस फैल येथे सत्वशिल बौद्ध विहार समिती व भिमयोध्दा ग्रुपच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष पंकज सोनोने, उपाध्यक्ष लखन ठोसर, सचिव अमित लोंढे होते.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी केलेल्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि बहुजन समाजाला प्रगती पथावर पोहचवले त्या महामानवाला आपण वंदन केले पाहिजे असे अध्यक्ष पंकज सोनोने यांनी १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करतांना बोलत होते,
या कार्यक्रम किशन काळे, शुभम कांबळे, सनी कांबळे, शुभम काळे, सौरव कांबळे, सचिन बनसोड़, अभिवादन कार्यक्रमाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..वैभव पोळके, हेमंत काळे, प्रशांत जाधव, अविनाश काळे, सागर काळे, सचिन गायकवाड़, समीर खान, सिधु पोळके, गौरव गायकवाड़, सागर ठोसर, वैभव वाघमारे, अनिकेत जाधव, रवि कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.