अकोला- (दि १७ सप्टें २०२३):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे विश्वबंधुत्व दिवसा निमित्त कवी केशवसुत काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य स्पर्धेत कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर अध्यापक व अनुसंधान महाविद्यालय,आपातापा येथील बी.एड. चे विद्यार्थी युवा वक्ते विशाल नंदागवळी यांनी मा. शांताराम बुटे यांच्या मार्गदर्शनात सहभाग घेवुन सामाजिक आशयाच्या परिवर्तनवादी कवितेचे बहारदार सादरीकरण करुण प्रथम क्रमांक पटकाविला.
कवी केशवसुत काव्य स्पर्धेचे हे ७ वे वर्ष होते. मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली. विद्यापीठाच्या कार्य क्षेत्रातील पाचही जिल्ह्यातुन एकूण ६७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. हे विशेष. स्पर्धेचे परीक्षण प्रा. ज्ञानेश्वर गटकर आणि डॉ. भगवान फाळके यांनी केले. आजचा तरुण केवळ प्रेमाच्याच रंगात भिजत नाही तर त्यांच्या सामाजिक जाणिवा अतिशय प्रगल्भ आहेत असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.बक्षीस वितरण सोहळ्यात मराठी विभागप्रमुख अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे , डॉ. मनोज तायडे, डॉ. माधव पुटवाड, डॉ. प्रणव कोलते डॉ. हेमंत खेडके आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.विशाल नंदागवळी हे उत्तम वक्ता म्हनुन प्रसिध्द आहेत. अनेक स्पर्धा मघ्ये त्यांनी राज्य तसेचं राष्ट्रीय पातळीवर व्याख्याने आणि कविता सादर केल्या आहेत. असंख्य बक्षीसे त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॅा विशाल इंगळे, डॅा.दादाराव गायकवाड, डॅा. मनोहर वासनिक, प्रा. प्रकाश गवई, प्रा. राहुल माहुरे, प्रा.ॲड. आकाश हराळ, अजिंक्य धेवडे, अमित लोंढे, आदित्य बावनगडे, आकाश जाधव,सुमेध पहुरकर, रोहीत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.