अकोला: तेल्हारा तालुक्यातील ग्राम दानापुर येथील विनोद विरघट सर यांनी वडीलांचा प्रथम स्मृती दिन गावातील स्मशान भुमीला सर्व सुविधा युक्त अशी पाण्याची टाकी दान देऊन जलरुपी आदरांजली वाहली.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचे राज्य आहे याची वारंवार प्रचीती येते. फुले शाहु आंबेडकर यांच्या कार्याने व विचाराने महाराष्ट्राची ओळख जगाच्या पाठीवर निर्माण झाली आहे. समता, बंधुता, न्याय व स्वातंत्र्यावर आधारित सर्व सामान्य माणसाला सन्मानाचे, स्वाभिमानाचे व प्रगतीचे जिवन जगण्यासाठी प्रेरणा देणारे महान नायक म्हणजेच फुले शाहु आंबेडकर होत. फुले शाहु आंबेडकर यांच्या कार्य व विचाराशी प्रामाणिक राहुन आणि सामाजिक जबाबदारी स्विकारून विनोद विरघट सर यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक कामाला सहकार्य करून स्वतःला फुले शाहु आंबेडकर यांचे वैचारीक वारस असल्याचे सिद्ध करून दिले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वाचनालय सुरू करुन अनेकांना शिक्षणासाठी मोठा आधार दिला. विनोद विरघट यांचे वडील दिवंगत प्रल्हादराव विरघट यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त गावातील स्मशानभूमीला सर्व प्रशस्त असा जलकुंभ दान देऊन एक क्रांती करून अंधविश्वास दुर करण्याचा प्रयत्न केला. स्मशानभूमीत वडीलांचा प्रथम स्मृती दिन, जलकुंभ उद्घाटन करून लोकांना स्मशानभूमीत च भोजनाची व्यवस्था करून स्मशानालाही आदराचे स्थान निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वडीलांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्ताने आयोजित जलकुंभ उद्धाघट सोहळ्याला विनोद विरघट सरांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र करून एक खुप मोठा आदर्श समाजा समोर ठेवला. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना समाज एकता अभियान अंतर्गत मानचिन्ह देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आले. वडिलांचा स्मृतीदिन हा समाजातील लोकांना जागृत करून प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने त्यांनी साजरा करून एक नविन पायंडा पाडला.
या ऐतिहासिक सोहळ्याचे अनेक मान्यवर साक्षीदार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या सरपंच सपना धम्मपाल वाकोडे या ह्या तर कार्यक्रमाची सुरवात ही भंते शाक्यपुत्र राहुल यांच्या धम्म देसनेने झाली. जलकुंभ लोकार्पण सोहळा हा उपस्थित सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या मध्ये मा. बळवंतराव अरखराव सर (उप विभागीय अधिकारी अकोट), प्रा. मुकुंद भारसाखळे (प्रतिष्ठान अकोला) मा. संदिपपाल महाराज (सत्यपाल महाराज यांचे शिष्य), मा. रामपाल महाराज (सत्यपाल महाराज यांचे शिष्य), मा. शेषराव टाले (मुख्याधिकारी न. प. बाळापूर), मा. सतिश प्रघणे (अध्यक्ष, समाज एकता अभियान, पुणे) सुकेशनी जमधाडे (पोलीस अधिकारी, मुंबई)
मा. भास्कर तायडे( पुरवठा अधिकारी, नागपूर), मा. श्रीकृष्ण झाडोकार (निरीक्षक, जि एस टी पुणे), सचिन गावंडे (प्रबुद्ध गृप, अकोला) आणि मा.सुमेध घनबहादुर (समन्वय अकोला) आदी मान्यवर उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्याला विनोद विरघट सरांचे मित्र, नातेवाईक, हितचिंतक तसेच गावकरी यांचीही उपस्थिती होती. मा. संदिपपाल महाराज व मा. रामपाल महाराज यांच्या विनोदी व प्रबोधनात्मक शब्दांनी लोकांचे प्रबोधन केले. या ऐतिहासिक स्मृतीदिन व जलकुंभ लोकार्पण सोहळ्याची चर्चा महाराष्ट्र भर होत आहे.