
स्थानिक: अकोला
14 ऑगस्ट 2022 रोजी न्यू तापडिया नगर परिसरात 35 वर्षीय विनोद टोबरे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्या हत्याकांडमधील फरार असलेला मुख्य आरोपी ऋत्विक बोरकर या गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
अकोला जिल्ह्यामधे गेल्या काही दिवसांपासून हत्येची मालिकाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रामुख्याने न्यू तापडिया नगर असेल, जठारपेठ चौक असेल किंवा जुने शहर असेल या हत्याकांडाने जिल्हा हादरून गेला होता. त्यात पोलीस प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत असताना सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू तापडिया नगर येथे झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असणारा ऋत्विक बोरकर हा अनेक दिवसांपासून फरार होता तेव्हा पोलिसांनी मेहनत घेत त्या आरोपीला मूर्तिजापूर येथून पकडुन सिव्हील लाईन येते जमा केले.
तेव्हा आता जिल्ह्यात पुन्हा एकदा शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची प्रचिती नागरिकांना येत आहे.