विनय कोचिंग क्लासेस व एस.वाय.के ज्यूनियर कॉलेजच्या विद्यमाने विशेष मार्गदर्शन

प्रा. गोविंद खांबलकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

अकोला: येथिल विनय सरांचे विनय कोचिंग क्लासेस अकोला आणि एस.वाय.के ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स व सायन्स गोरव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने 11 जून रोजी कर्मचारी भवन अकोला येथे विद्यार्थी व पालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनय कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.विनय इंगळे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून एस.वाय
के जुनियर कॉलेज गोरव्हाचे प्रा.गोविंद एस खांबलकर यांची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ पल्लवी संचालिका व्हीसीसी अकोला, प्रा.गवारगुरु,प्रा.कुलदीप, प्रा.उमेश,प्रा
दुबे, प्रा.बोचरे प्रा.अमर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती

प्रमुख मार्गदर्शक प्रा.गोविंद एस खांबलकर यांनी विद्यार्थी व पालक शिक्षक यांना केंद्रबिंदू स्थानी महत्त्पुर्ण मार्गदर्शन केले.विज्ञान शाखेमधील विवीध बाबी, भविष्यातील वाटचाली,विषय निवड पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करित विज्ञान विषयासंदर्भातील प्रश्नांबाबत विद्यार्थी व पालकांशी चर्चा केली.तर जेईई,नीट व आयआयटी सीईटी या परीक्षांचा पात्रता निकष काय असतो.या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले तर आर्ट कॉमर्स व सायन्स या विविध शाखांचे मार्गदर्शन करीत मुले अभ्यास का करीत नाहीत याबाबत विविध उपाययोजना प्रमुख मार्गदर्शनाच्या माध्यमातुन विशद करण्यात आल्या.तर विद्यार्थी पालक तसेच शिक्षक यांचा संपूर्ण ताळमेळ कसा जुळवावा व विद्यार्थ्यांपासून मोबाईल कसा सोडवावा यावरील उपाय व विद्यार्थी शिक्षण प्रवाहात गैरहजर राहत असतील तर विद्यार्थ्यांचे काय नुकसान होते याबाबत प्रा.खांबलकर सर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले

Box

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय कोचिंग क्लासेस चे प्रा विनय इंगळे यांनी केले. यावेळी प्रा.कुलदीप व प्रा अमर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या अभ्यासाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे कार्यवाहक म्हणून साधना, सोनाली, मुकेश झटाले व विनय अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पल्लवी इंगळे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published.