विदर्भाचा हास्य कलावंत

ॲाक्टोबर महीणा तसा ही महत्वपूर्ण समजल्या जातो पावसाचा जोर थांबलेला असतो हळु हळु गुलाबी थंडी ला सुरुवात झालेली असते…परतीच्या पावसाचा देखील जोर असतो. आता तर ग्लोबल वॅार्मींग मुळे ऋतु पूर्णत: बदलले त्यामुळे आता कोणता ऋतु सुरु आहे हे तपासावं लागतं असो..आणखी म्हणजे बॅालीवूड मधील प्रसिध्द प्रेम अमीत-रेखा यांचा वाढदिवस देखील याचं महिण्यात एका पाठोपाठ असतो काय सुवर्ण योग म्हणावा..इतकं या महीण्याचं महत्व आहे..हे एवढ्या साठी की याचं महिण्यात दोन सेलीब्रीटी च्या अचानक भेटी झाल्या एक म्हणजे विजय खंडारे ज्यांच्या विषयी मी आठ दिवसांपूर्वीच लिहीले आणि दुसरे म्हणजे सोनी टिव्ही मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ज्यातील कलावंतांनी अख्खा महाराष्ट्र चं काय तर देशाला खळखळून हसवलं आणि कोरोना च्या विळख्यातुन बाहेर काढलं असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.यांतील आपल्या अकोल्यातील सेलीब्रेटी म्हणजे कुणाल रविंद्र मेश्राम उर्फ एम.कुणाल रविंद्र‘उर्फ’ हे पण फार महत्त्वाच्या आणि महान व्यक्तींच्या नावाला लागतं…हे विशेष..ज्ञानावर आणि कलेवर कुणाचीही मक्तदारी नाही.काही लोक मक्तेदारी सांगतात हे त्यांचे अज्ञान आहे असे मी मानतो….

बॅार्न टॅलेंट म्हणतात न तसे टॅलेंट कुणाल मधे आहे. म्हनुन चं तर संधी मिळाल्या बरोबर तीचं सोनं आपल्या अभिनयाच्या भरवशावर त्याने केले.बॅालीवूड मधे आणि नाटकामध्ये काही डॅायलॅाग फार प्रसिद्ध आणि अजरामर आहेत फार मोजक्या आणि महान कलाकारांच्या नावावर आहेत जसे ‘पुष्पा…आय हेट टियर्स’….,‘कितने आदमी थे..’, ‘कुणी घर देतां का घर’…पासुन थेट ‘बडे बडे देशों मे छोटी-छोटी बाते होती रहती है’ … वगैरे… यामधे कुणाल ही मागे नाही अल्पावधीतचं कुणाल ने महाराष्ट्राची हास्य जत्रामधे स्वत:चा डॅायलॅाग आणि आपली वैदर्भीय शैली फेमस करुन दाखवली याआधी देखील भारत गणेशपुरे यांनी पाया घालुन दिलाचं..‘जेवन करुण घ्या नं,नाहीतन तुमची साखर वाढन नं’… कुणाल दिसल्या बरोबर प्रत्येकाच्या मुखातून आपसुक हा संवाद बाहेर पडतो याचा मोह आमच्या श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे प्राचार्य डॅा.ए.एल. कुलट सर यांना देखील आवरतां आला नाही..आज मराठी सिनेमातील एवढ्या दिग्गज आणि प्रतिभावंत कलाकारांबरोबर कुणाल काम करतो ही बाब एक अकोलेकर म्हनुन मला फार महत्चाची वाटते..आणि कुणाल चा अभिमान ही वाटतो.. कारण अप्रत्यक्ष का? होईना तो माझा विद्यार्थी आहे. याची प्रचीती त्याने अकोला रेल्वे स्टेशन वर दिली तो रस्त्याने जात होता जाताना मी त्याला माझ्या नेहमीच्या चहाच्या ठिकाणी माझे मित्र प्रा.ॲड. आकाश हराळ सर यांच्या सोबत उभा दिसलो त्याने गाडी वळवली आणि भेटायला आला. सर…,तुम्ही दिसले आणि मी परत आलो यापेक्षा आणखी काय हवं एका शिक्षकाला.. एवढी विनम्रता आजही त्याच्या मध्ये आहे याचा अर्थ तो राईट ट्रॅक वर आहे..

जर तुमच्या मध्ये दुर्दम्य आशावाद आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीही रोखु शकत नाही याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे कुणाल..अकोल्यातील अकोट फाईल भागात राहणारा हा कलाकार आजही अकोल्यातील अशा काही फैल आणि नगरांची नावे घेतली की, ठरावीक लोक नाकं मुरडतात, बॅंक लोन देत नाही..सिबील कितीही चांगले असो…बालपणापासूनचं शाळा महाविद्यालयातून कुणाल लहाण लहाण भूमिका करत होता त्याला खरी दिशा मिळाली ते आमच्या भाऊसाहेबांनी म्हणजेचं डॅा पंजाबराव देशमुख यांनी बहुजनांच्या मुलांना शिकण्याकरीता स्थापन केलेल्या श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथुन…आज कुणाल एवढ्या मोठ्या मंचावर आपली कला सादर करतो ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.अकोल्यातील नाट्यचळवळ प्रगल्भ व्हावी नवोदितांना संधी मिळावी यासाठी अनेक भविष्यकालीन योजना संवाद साधतांना त्याने बोलुन दाखवल्या..कुणाल ने कस्तुरी, आपला अधिकार, फ्रेशर्स, दि ब्लाईंड, सुनहरी यांसारख्या शॅार्ट फिल्म केल्या आहेत..

त्याचप्रमाणे सुपर बॅाय,हे घरटे, चिंगी, दाह, पाहुणं जरा जपुन, अगडबंब, एक ती..असे चित्रपट केले आहेत..जेत्ता, मनफितुर, सलमान सोसायटी…ह्या त्याच्या अपकमींग मुव्ही आहेत..वस्त्रहरण, प्रेमपुजारी, निशाणी डावा अंगठा, पाहीजे जातीचे, तृतीय रत्न, वाडी-२००६, गॅलिलीओ यासारखे व्यावसायीक नाटकात भूमिका आणि सखाराम बाईंडर, वासनाकांड, बेअन,आणि इंद्रजीत, ती फुलराणी, देवनवरी, बकरी, शांतता कोर्ट चालु आहे, समोरचा नाडकर्णी, वेटींग फॅार गोदो, सफर, दि मुव्हमेंट, खेळ, राजदर्शन, वेधपश्य, बृहन्नला यासारखे प्रायोगीक नाटकात भुमिका केल्या….प्रसिध्द अशा झाडपट्टी रंगभूमी महोत्सवात दोन घास सुखाचे, आई जन्माची शिदोरी, घायाळ पाखरं, ठलवा, मरते रे मैना झुरते रे राघु यामधे देखील भूमिका केल्या आहेत..अनेक नामवंत संस्थांचे मानाचे पुरस्कार, अभिनयावरील कार्यशाळा, अनेक ठिकाणी सदिच्छा भेटी, त्यांच्या नावे आहेत..असा हा हरहुन्नरी कलावंत आपल्या विदर्भाचे आणि विशेषत: अकोल्याचे नांव सोनी मराठी सारख्या प्लॅटफॅार्म वरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत आहे त्याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमी चं आहे. भविष्यात अभिनय क्षेत्रात तो अशीचं उत्तुंग भरारी घेत राहो हीचं मंगल कामना…त्याच्या साठी एक शेर आठवतो…‘अभी तो नापी है..मुठ्ठी भर जमीं हमने,अभी तो…सारां आंसमां बाकी हैं।।।खुप छान वाटलं कुणाल ला भेटुन संवाद साधुन अनेक जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published.