गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले

पोलिसांच्या डीबी पथकाची कारवाई

आज दि.१८/०३/२०२४ रोजी सकाळी ०५/२० वा चे सुमारास पो. स्टे. ची डी.बी. पार्टी रात्रगस्त पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीती वरून मोमीनपुरा चौकात नाकाबंदी करत असतांना मिळालेल्या गुप्त माहीती प्रमाणे एक महेन्द्रा झायलो कंपणीची ग्रे रंगाची गाडी येतांना दिसली तिला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी थांबली नाही. पो स्टॉफ ने पाठलाग करून कागजीपुरा येथे जावुन सदर वाहन सापळा रचुन पकडले असता वाहन चालक व आणखी एक इसम वाहन सोडुन पळुन गेले. सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये ०८ गोवंश जातीची जनावरे किं.अं. १,३०,०००/- रू व महेन्द्रा झायलो कंपणीची गाडी क एम. एच.०२ सि.आर.०१६० किं.अं. ६,००,०००/- असा एकुण ७,३०,०००/रु चा मुददेमला कार्यवाही करून हस्तगत करण्यात आला. व सदर बाबत दोन अज्ञात इसमा विरुध्द कलम ५,५ (अ), ११ (ल) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधीनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कामगीरी श्री बच्चन सिंग पोलीस अधिक्षक अकोला, श्री अभय डोंगरे अपर पालीस अधिक्षक, श्री सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री मनोज बहुरे यांचे मार्ग दर्शनाखाली पो. स्टे. चे. डी.बी. पथक कर्मचारी पोहवा विजय सावदेकर, पोहवा तोहीद अली काझी, पोका अनिल धनभर, रोशन पटले सर्व नेमणुक रामदापेठ, अकोला यांनी केलेला

Leave a Reply

Your email address will not be published.