
*आज दि.९ नोव्हेंबर रोजी अकोला महानगर पालिका आयुक्त यांना भेटून, वसंत देसाई स्टेडियम च्या समोरील भागातील राहणाऱ्या या गोरगरिबांना बेघर करू नका, यांना जागा उपलब्ध करून द्या अशा मागणी करिता महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले. पोटापाण्यासाठी भाकरीच्या तुकड्यासाठी रस्त्यावर आपले दुकाने लावून हात मजुरी करून आपले कष्टाने भाकर तुकडा मिळावे म्हणून रात्र आणि दिवस कडाक्याच्या थंडीत आपला परिवार उघड्यावर घेऊन राहण्याची परिस्थिती आली या भूमिहीन कष्टकरी मजूर यांच्यावर आली अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांना बेघर करण्याचे प्रयत्न केले आहे. एकीकडे हे महानगर पालिकेचे अतिक्रमण धारक,मोठमोठे ट्रॅव्हल्स ट्रक त्या ठिकाणी उभे करून त्यांच्याकडून पैसे घेऊन आपले खिसे गरम करत आहे व हे गोरगरीब कष्टाळू यांना हाकलून त्रास देऊन तुम्ही दुकाने लावले तर तुमचे दुकानात तोडण्यात येतील. अशा धमक्या देऊन त्यांना पडून लावण्याचे काम करत आहे.
जे मजूर आहेत ते गेल्या 30 ते 40 वर्षापासून वसंत देसाई स्टेडियमच्या रोडवर आपले घर झोपडीचे बांधून राहत आहेत आतापर्यंत त्यांना कोणीही उठवले नाही मग आताच या प्रशासनाला कसा जाग आला,हा कुठला सामाजिक विषय नाही कुठला धार्मिक विषय नाही हा माणसाच्या माणुसकीचा विषय आहे,आपले उली उली चिमुकले घेऊन या थंडीत कुठे भटकतील असा प्रश्न उपस्थित झाला आहे.? त्यांचे घर तोडून त्यांना उघड्यावर झोपण्याची वेळ या महानगरपालिकेने आणली आहे,अशा परिस्थितीत एखाद्या जीवाची हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार.? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या गोरगरीब जनतेला या महानगरपालिकेने या अतिक्रमण विभागाने न्याय द्यावा अशीच आम्ही मागणी करतो व हे पोट भरून आपला उद्धार निर्माण करून आपला परिवार चालवण्याचे काम करतात त्यांना तिथेच राहण्याची त्यांनी परवानगी द्यावी अशीच आम्ही मागणी करतो व या गोरगरीब जनतेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत असाच आम्ही इशारा महेंद्र भाऊ डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष यांनी दिला. हे लोक कोणी आमच्या वार्डातले नाही किंवा मतदार संघातले नाही. एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना मदत करत आहे. असा प्रत्येकाने करावे अशी माझी इच्छा आहे असा संदेश त्यांनी दिला.
तेव्हा सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्यचे आकाश दादा शिरसाट, नागेश बागडे, संतोष नितोने, मारुती वासनिक, सुमित भामरे,अक्षय सहारे,चंद्रशेखर नकाशे, सोनू वासनिक,प्रशिक मेश्राम, अमोल उके, कुणाल डोंगरे,आशिष मेश्राम, नागेश मेश्राम आदी उपस्थित होते.