स्थानिक: अकोला येथे दिनांक 19 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 4 वाजता दरम्यान मोहता मील गौरक्षण (प्रभाग क्रमांक 7) येथील अशोक नामदेव भगत यांचे अति मुसळधार पावसामुळे घर कोसळले व त्यात कोणती जीवित झाली नाही पण त्यांच्या घराचे खूप मोठे नुकसान झालेले होते. दैनंदिन जीवन आवश्यक साहित्य, कपडे, घरातील मोठे वस्तू हे पूर्ण शक्तीग्रस्त झालेले होते. सदर कुटुंबातील प्रमुख रिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाडा ओढत जीवन जगत आहेत. त्यांची परिस्थिती हलकीची असल्यामुळे ते घराचं पुनर्वसन पण करू शकत नाही. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष व ऑल इंडिया संपादक संघ जिल्हाध्यक्ष महेंद्र डोंगरे व सहकारी मिळून सकाळी 4 वाजता त्यांच्या मदतीला धावून गेले. सदर कुटुंबाची राहण्याची व्यवस्था आणि किराणा भरून देण्यात आला.
तेव्हा महेंद्र डोंगरे यांनी तहसीलदार सुनील पाटील आणि मंडळ अधिकारी महल्ले साहेब यांच्याशी चर्चा करून मदत पोहचविण्यासाठी विनंती केली. सोबतच अकोला बौद्ध समाज संघर्ष समितीकडे मदत करण्यासाठी आव्हान देखील केले.
यावेळी महेंद्र डोंगरे (जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी व जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया संपादक संघ) त्रिमूर्ती बुद्ध विहाराचे अध्यक्ष नागेश बागडे, अभिमान नितोने, राष्ट्रवादीचे युवा नेता संदीप कांबळे, प्रजल मेश्राम, अजय नितोने, सोनू वासनिक, आकाश रामटेके, प्रतीक डोंगरे, रोहन लाटे, ऋषिकेश वारे, मारुती वासनिक, अक्षय सहारे, अमोल उके, निखिल वारे, दिलीप कांबळे,विकी सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.