दि.12 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मा. आयुक्त महानगर पालिका अकोला यांना यशवंत भवन मार्गाचे सर्वेक्षण करून तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी करण्याचे निवेदन देण्यात आले, यशवंत भवन मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ला कृषी नगर जवळ लागून आहे, हा मार्ग जवळपास एक किलोमीटरच्या अंतराचा आहे आणि मुख्य वस्तीला जोडणारा मार्ग आहे, या मार्गाने महाविद्यालये तथा शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणांत आहेत त्या मुळे या मार्गाने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येजा करीत असतात, ज्या राष्ट्रीय महामार्ग कडून यशवंत भवन कडे जाताना उतार लागतो या उतारावर संबधित महामार्गाचे कंत्राटदार व कंत्राट देणारे शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी अपघात होण्याची कुठलीही दक्षता न घेता या महामार्गाच्या उतारावर व आजू बाजूला कुठलाही मुरूम अथवा सिमेंटकॉक्रीट टाकण्यात आले नसल्याचे निर्शनास आहे, यामुळे या मार्गाने येजा करणारे विद्यार्थी व नागरिकांची वाहने या उतारावर घसरून पडत आहेत, हल्लीच एक दोन विद्यार्थी या ठिकाणी पडून जखमी झाले आहेत, हा मार्ग रहदारीचा असल्याने याठिकाणी आणखी अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची संभावना नाकारता येत नाही, याची जाणीव होताच वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तात्काळ मा. आयुक्त यांना निवेदन देऊन या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी वंचितच्या वतीने देण्यात आला, यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष वैभव खडसे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, जिल्हा सचिव अँड. मीनल मेंढे, माजी महानगर अध्यक्ष जय तायडे, अकोला तालुका प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ, संघटक आकाश गवई, मीडिया प्रमुख सूरज दामोदर, साहिल बोदडे, सचिन डोंगरे, नम्रता आठवले, सोनाली कांबळे, निखिल गजभिये, यांसह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते