
उद्या २० मार्च रोजी मनपा वर वंचितची धडक
स्थानिक: अकोला महानगर पालिकेचा मनमानी कारभार थांबविण्यासाठी, सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व झोपेचे सोंग घेतलेल्या म.न.पा. जागे करण्यासाठी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी अकोला महानगराच्या वतीने अकोला म.न.पा. वर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. महानगर पालिकेचा सुरू असणारा मनमानी कारभार हा सामान्य जनेतासाठी घातक ठरत असून गरिबांचे त्यात शोषण होत आहे. तो कारभार थांबविण्यासाठी आणि अवाजवी वसूल केला जाणारा टॅक्स रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय ते म.न.पा. अकोला पर्यंत सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वा मोर्चा निघणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आपले हक्क व अधिकार मिळविण्यासाठी सामान्य जनतेने मोर्चामध्ये सामील व्हावे वंचित बहूजन आघाडी हे आपल्या सोबत न्याय मिळवून देईपर्यंत पाठीशी आहे. असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी केले आहे. त्यासाठी खालील मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करत असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. १) महानगर पालिकेने वाढविलेला अवाजवी घरटॅक्स रद्द करावा. २) मनपाने अवैध व चुकीची पाणी कर वसुली थांबविणे.३) पिंप्री चिंचवड महानगर पालिका धर्तीवर अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात यावे. ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचे सौदर्यीकरण करून त्या परिसरात घाण कचरा करणा-यावर दंडात्मक कारवाई करावी.५) अकोला शहरातील कलावंतासाठी सांस्कृतिक भवन सुरू करण्यात यावे.७) मनपा हद्दीतील जसे भरतीया दवाखाना, कस्तुरबा गांधी यांच्या सारखे ५ दवाखान्या असून यामध्ये सुविधाचा व तज्ञ डॉक्टरांचा अभाव असून यामध्ये अत्याधुनिक सेवा म.न.पा. कडून देण्यात यावे.८) मनपा हद्दीतील अतिक्रणीत जागा नियमानुकुल करून घरकुलाचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यात यावा.९) अकोला शहरातील घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्या करिता कायम स्वरूपी झोननिहाय डम्पींग ग्राऊंड ची व्यवस्था करण्यात यावी. १०) खरप न्यु तापडीया नगर रेल्वे गेट उड्डाणपुल त्वरीत कामपुर्ण करून जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात यावे.११) अकोला मनपामध्ये समाविष्ठ १३ ग्राम पंचायत व २४ गावातील मुलभूत सुविधा जसे पाणी, लाईट, सफाई, रस्ते, नाल्या इत्यादी सुविधा ताबडतोब पुर्ण करण्यात यावे. त्यानंतर म. न. पा. टॅक्स लागू करण्यात यावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या मा.अरुंधतीताई शिरसाट (महिला प्रदेश महासचिव) मा.बालमुकुंद भिरड (पश्चिम विदर्भ महासचिव) मा.शंकरराव इंगळे(महानगर पूर्व अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य) मा.वंदनाताई वासनिक (महिला महानगर अध्यक्ष) मा.कलीम खान पठाण(महानगर पश्चिम अध्यक्ष) मा.मनोहर पंजवानी(व्यापारी नेते) मा.प्रा. संतोष हुशे(महानगर समन्वयक) मा.सुवर्णाताई जाधव(महिला महानगर महासचिव) मा.जयभाऊ तायडे (महानगर पुर्व युवक अध्यक्ष) मा.आशिष मांगुळकर (महानगर पश्चिम युवक अध्यक्ष)मा.अॅड.संतोष रहाटे (ओबीसी नेते) मा.निलेश देव (महानगर नेते)मा. विकास सदाशिव (सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) मा.पराग गवई (महानगर नेते)मा. नितेश किर्तक (युवा नेते)मा.सरलाताई मेश्राम (मा. जि. प. सदस्य)पुरूषोत्तम वानखडे (महानगर प्रसिद्धी प्रमुख)मा.अमोल कलोरे, मा.योगेश कीर्तक, मा.रितेश यादव, मा.वैभव वाघमारे , मा.अक्षय वाघसंदिप पंजवानी, आतिश शिरसाट, कुणाल राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.