अकोला प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने या आंदोलनाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्यासाठी येत्या सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
प्रलंबित मागण्यासाठी १० जुलैपासून आंदोलन सुरु आहे
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने या आंदोलनाची हाक दिली आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत गेल्या काही वर्षांत अन्याय झालेला आहे. आठ वर्षापूर्वी मागण्या मान्य होऊनदेखील त्याबाबत अद्यापही शासन निर्णय होत नसल्याचे संघटनेने नमूद केले. २००६ मध्ये महसूल विभागाचा आकृतिबंध तयार करण्यात आला. त्यानूसार २०१६मध्ये आकृतिबंध होणे क्रमप्राप्त होते. मात्र अद्यापही आकृतिबंध मजूर झाला नाही. प्रलंबित मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १० जुलैपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने बेमुदत काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी नमूद केले
प्रमूख मागण्या
1) महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समीतीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील
कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा. 2) मराठवाडा विभागातील अव्वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार या पदावर पहोत्रती तात्काळ देण्यात यावी.
3) महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ लागू करण्यात यावा.
4) नायब तहसिलदार संवर्ग हा राजपत्रीस संवर्ग असून सुध्दा त्याची वेतनश्रेणी वर्ग तीन संवर्गाची देण्यात आलेली आहे ती बदल करून 4800/- करण्यात यावी.
5) कर्मचाऱ्यांचे वेतन निर्यामत पणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. 6) महसुल सहाय्यक व तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अर्हताधारी असूनही महसूल सहाय्यक यांचा ग्रेडपे
1900/- व तलाठी यांचा ग्रेड 2400/- आहे. त्यामळे महसूल सहाय्यक यांचा ग्रेड पे 2400/- करण्यात यावा.
7) महसूल विभागात सेवा नियमित होणेसाठी महसुल सहाय्यक व तलाठी यांना विभागीय दुय्यम सेवा परिक्षा व पदोन्नतीसाठी महसुल अहर्ता परिक्षा ह्या दोन परिक्षे ऐवजी एकच परिक्षा पद्धत करण्यात यावी. ) महाराष्ट्र शासन, वित्त विभाग यांचे दिनांक 03.02.2023 रोजीच्या दिनांक 01 जानेवारी 2006 रोजी किंवा 8
त्यानंतरच्या त्याच्या पदोन्नतीच्या दिनांकापासून उंचावून देण्यात यावे अशी तरतूद असतांनाही अव्वल कारकून पदावरील पात्र कर्मचाऱ्यांचे सुधारीत वेतन निश्चिती करावी.
9) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या नियंत्रणाखालील लिपीक टंकलेखक (महसूल सहायक) संवर्गामधून
अव्वल कारकून पदावरील पदोव्रती केवळ ‘महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम, 1999 ‘मधील तरतुदीनुसार सेवा
ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी.
10) महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथक यांचे ऐवजी समक्ष असलेल्या महसुल विभागातीलच नियुक्त लेखाधिकारी यांना वेतन पडताळणीचे अधिकारी प्रदान करणे बाबत. 11) ‘अव्वल कारकुन’ या पदाचे नामांतरण करून ‘सहाय्यक महसूल अधिकारी हे पद करावे.
12) महसुल विभागातील सुधारीत आकृतीबंध मंजुर होईपर्यंत पुरवठा विभागातील पदे भरण्यात येऊ नयेत.
13) चतुर्थश्रेणी शिपाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असतांना तलाठी संवर्गामध्ये 25 टक्के पदोन्नती देण्यात यावी आणि कोतवाल पदांना चतुर्थश्रेणी ड दर्जा देण्यात यावा. कोतवाल पदोव्रती करत असतांना पदोत्रती कोटा वाढविण्यात यावा.