
सम्राट अशोक सेने तर्फे करण्यात आले स्वागत…
स्थानिक: अकोला, सम्राट अशोक सेने तर्फे क्रांतिभुमी महाड येथून संविधानाच्या जनजागृतीसाठी निघालेल्या संविधान रथाचे अकोला येथील अशोक वाटिका याठिकाणी स्वागत करण्यात आले. भारतीय संविधान आपले रक्षण करते आर्टिकल 12 ते 32 हे प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकाला आपले अधिकार बहल करते, देशातील प्रत्येक नागरिकांचं एवढंच कर्तव्य आहे की या संविधानाचा प्रचार आणि प्रसार घरोघरी केला पाहिजे. त्यांना संविधानाची माहिती मिळून त्याची जाणीव झाली पाहिजे या उद्देशाने ही सविधान रॅली महाड क्रांतिभूमी येथून भारतीय संविधान रथाचा देखावा तयार करून अनेक जिल्ह्यात जावून महाराष्ट्रभर संविधानाची जनजागृती करत आहे.

आज अकोला जिल्ह्यातील अशोक वाटिका येथे या सविधान रॅलीचे आगमन झाले तेव्हा सम्राट अशोक सेना व अशोक वाटिका प्रेरणाभूमी संघ यांच्या वतीने संविधान उद्देश पत्रिका म्हणून भेट देण्यात आली व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळेस संविधानाचे गाढे अभ्यासक अनंत भवरे सर औरंगाबाद यांनी संविधानाचे महत्त्व सर्वांना सांगितले. सविधान कशा पद्धतीने घरोघरी पोहोचवणार याची माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले. संविधानाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक नागरिकांनी अशा उपक्रमाला मदत केली पाहिजे आणि सहभाग नोंदविला पाहिजे असे मत सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाश शिरसाट यांनी केले. त्यावेळी समस्त उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.