अकोला प्रतिनिधी: अकोला जिल्हयामध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६ (अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आज पावेतो एकुण ८८ गुन्हे व ३४ मिसिंग असे एकुण १२२ प्रकरणे उघडकिस आणले आहेत.
पोलीस स्टेशन मुर्तिजापुर ग्रामीण अप नं ३८९/२१ क ३६३ भादवि ची डायरी तपासकामी अमावाकक्ष येथे प्राप्त झाली. सदर गुन्हा हा ४ वर्षापासुन प्रलंबित होता. सदर गुन्हयातील संशयित आरोपी व पिडीत मुलगी यांचा शोध मुंबई, पुणे, अमरावती, नागपुर येथे घेतला असता मिळुन आले नाही. तपासादरम्यान गुन्हयातील पिडीत मुलगी व संशयित आरोपी हे अकोल्यामध्ये आले असुन ते जठारपेठ चौक अकोला येथे आहेत. अशी गुप्तबातमीदारांकडुन खात्रीलायक माहीती मिळाल्याने अमावाकक्ष स्टॉप सरकारी वाहनाने जठारपेठ चौकात गेलो असता तेथे एक मुलगी व एक मुलगा उभे होते. गुन्हयातील पिडीत मुलगी व संशयित आरोपी असल्याची सहानिशा करून त्यांना गुन्हयाबाबत माहीती देवुन विचारपुस केली. गुन्हयाबाबत वरिष्ठांना माहीती देण्यात आली. पिडीत मुलगी व संशयित आरोपी यांना सोबत घेवुन अमावाकक्ष येथे आलो. पिडीत मुलगी हीला पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस करण्यात आली. तसेच पुढील तपासकामी पो.स्टे. मुर्तिजापुर ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सा, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी सा. शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कामगिरी ही पोनि उज्वला देवकर, सपोनि कविता फुसे, पोउपनि मनोहर वानखडे, सपोउपनि सुरज मंगरूळकर, पोहेकॉ धनराज चव्हाण, पोकॉ प्रदीप उंबरकर, मपोकॉ पुनम बचे, वाहन चालक पोकों अविंद्र खोडे यांनी केली असुन लवकरच इतर गुन्हयामध्ये सुध्दा तत्परतेने पिडीत मुली व आरोपी यांचा कसुन शोध घेऊन गुन्हयांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करित आहे.