‘अमृत’तर्फे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी उपक्रम

बेकरी व्यवसायाविषयी १८ दिवसांचे निवासी प्रशिक्षण

अकोला, दि.२२: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रवोधिनीतर्फे (अमृत) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी बेकरी व्यवसायासंबंधी प्रशिक्षण दि. 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषकभवनात होणार आहे.

व-हाडातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील जिल्ह्यातील अमृत लक्षित उमेदवारांना प्रशिक्षणात भाग घेता येईल. त्यासाठी किमान १२ वी उत्तीर्ण, शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख, राज्याचा रहिवासी दाखला, उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला, वयोमर्यादा २१ ते ५० असावी.

प्रशिक्षणात बेकरी उत्पादनाची व्याप्ती व महत्व, बेकरी उद्योगामध्ये विविध संधी, केक, टी टाईम केक, पफ पेस्ट्रीज, ब्रेड, टोस्ट पाव, पिझ्झा, बर्गर आदी विविध बाबी प्रात्यक्षिकाद्वारे तज्ज्ञांकडून शिकवल्या जातील. उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय गुणसंपदा, शासकीय योजनेची माहिती, बँकेची कार्यप्रणाली, प्रकल्प अहवाल याविषयी प्रशिक्षण तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात प्रवेशासाठी मुलाखती दि. २७ जानेवारी रोजी दुर्गा चौकातील जिल्हा उद्योग केंद्रात दु.१२ वा. होतील. त्यासाठी दि. २६ जानेवारी सकाळी ११पर्यंत ९८२२३९१३३७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी प्रसन्न रत्नपारखी, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्याशी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published.