
अकोला प्रती – अंत्यंत गरिब कुटुंबातील हात मजुरीवर काम करणाऱ्या उमेश चव्हाण या व्यक्तींच्या पत्नीचे सौ मनिषा उमेश चव्हाण या महिलेचे दि .१४/०३/२०२० रोजी आयुर्वेद रुग्णालय व अनुसंधान केंद्र अकोला येथे डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्या हस्ते कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली होती परंतु हे शस्त्रक्रिया अपयशी झाली असुन या महीलेला दोन महिन्यांचे दिवस गेले आहेत संबंधित *डॉ श्यामकुमार सिरसाम यांना विचारणा केली असता ते म्हणाले शस्त्रक्रिया अपयशी झाली तर मी काय करू* असे उद्धटपणे उत्तर दिले सौ मनिषा उमेश चव्हाण या महिलेचे दोन वेळा सिझर झाले असुन आता तिच्या जिवाला धोका आहे म्हणून अश्या कामचुकार, रुग्णांशी उद्धटपणे वागणाऱ्या बोगस डॉक्टर विरूद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी व त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखवण्यात यावा आम्ही संबंधित डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन,मा.तानाजी सांवत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य,शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये, जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम जिल्हाधिकारी अकोला यांच्या कडे तक्रार केली.